Rashmi Shukla: पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारताच रश्मी शुक्ला अ‍ॅक्शन मोडवर; सायबर क्राईमवर ठेवणार लक्ष

Maharashtra DGP Shukla: रश्मी शुक्ला १९८८ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. रश्मी शुक्ला यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्या याआधी सशस्त्र सीमा बलाच्या प्रमुखही होत्या.
Maharashtra DGP Shukla:
Maharashtra DGP Shukla:Saam Tv
Published On

(सचिन गाड)

Rashmi Shukla Director General of Police Maharashtra:

आज रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्याच्या दिवशी रश्मी शुक्ला यांनी आपल्या कामाचे काही लक्ष्य ठेवले. आपल्या पदभार घेण्याचा पहिला दिवस असल्याचं त्या म्हणाल्या. कायदा व सुव्यवस्था महिला सुरक्षा प्राथमिकतेवर असेल. सायबर गुन्हेगारी कमी करण्याकडे देखील लक्ष देणार. महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी काम करणार असल्याचं त्या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.(Latest News)

महाराष्ट्र पोलीस महासंचालकाचा (Maharashtra Director General of Police) अतिरिक्त पदभार असलेले मुंबई पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner) विवेक फणसळकर (Vivek Phansalkar) यांच्याकडून रश्मी शुक्ला यांनी पदभार स्वीकारला. रश्मी शुक्ला राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत. रश्मी शुक्ला यांनी सशस्त्र सीमा बलाच्या प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं आहे. याआधी शुक्ला यांनी राज्य गुप्तचर विभागाच्या (State Intelligence Department) प्रमुख तसेच पुणे पोलीस आयुक्त (Pune Police Commissioner) राहिल्या आहेत. त्या १९८८ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाराष्ट्रात येऊन बर वाटतंय हे घर आहे कारण ३३ वर्ष येथे काम केलंय. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था कायम चांगली असते. महिलांची सुरक्षितता आमचं महत्वाचं ध्येय असेल. त्याचप्रमाणे सायबर क्राईमवर देखील आमचं विशेष लक्ष असेल. फ्रेश आणि पॉजिटीव्ह वातावरणात मी आज चार्ज घेत आहे. नवीन कामाला सुरूवात करतेय, असं शुक्ला म्हणाल्या.

महामार्गांवर जे अपघात होतात त्यावर देखील आमचं लक्ष असेल. मी सकारात्मक दृष्टीने चार्ज घेतेय त्यामध्ये तुमचाही चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा. महाराष्ट्र पोलीस कोणत्याही घटकावर अन्याय होऊ देणार नाही. महाराष्ट्रात जनतेला असं वाटणार नाही की आपण असुरक्षित नाही. नार्कोटीकवर देखील आमचं लक्ष असेल लहान मुलं याकडे वळणार, नाहीत याकडेही आमचं लक्ष असेल, असंही रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) कार्यभार स्वीकारताना म्हणाल्या.

Maharashtra DGP Shukla:
New DGP of Maharashtra: मोठी बातमी! राज्याच्या पोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती, त्यांच्याबद्दल जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com