New DGP of Maharashtra: मोठी बातमी! राज्याच्या पोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती, त्यांच्याबद्दल जाणून घ्या

Rashmi Shukla New DGP of Maharashtra: एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याच्या पोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
New DGP of Maharashtra
New DGP of MaharashtraSaam Tv
Published On

>> नितीन पाटणकर

Rashmi Shukla New DGP of Maharashtra:

महाविकास आघाडी मधील काही राजकीय नेत्यांची फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांची अखेर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 1988 च्या बॅचच्या आयपीएस असलेल्या रश्मी शुक्ला यांची कारकीर्द मोठ्या वादात सापडली होती.

शुक्ला यांच्यावरती पुणे आणि मुंबई या दोन ठिकाणी वेगवेगळे दोन गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. पुढे दोन्ही गुन्हे कोर्टाने रद्द केले. नाना पटोले, संजय काकडे, संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडी मधील अनेक नेत्यांची फोन टॅपिंग प्रकरणाची शुक्ला यांच्यावर आरोप होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

New DGP of Maharashtra
US judge Attacked: महिला न्यायाधीशांच्या निर्णयाने आरोपी संतापला, 'स्पायडरमॅन'सारखी उडी घेत केला हल्ला; पाहा VIDEO

कोण आहेत रश्मी शुक्ला? (Who Is Rashmi Shukla)

रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) अतिरिक्त महासंचालक म्हणूनही काम केले आहे. शुक्ल यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त आणि राज्य गुप्तचर शाखेचे संचालक म्हणून काम केले आहे. (Latest Marathi News)

'फडणवीस यांनी रश्मी शुक्ला यांना रक्षाबंधनाची भेट दिली'

दरम्यान, रश्मी शुक्ल यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. यातच शरद पवार गटाचे आमदार आणि नेते एकनाथ खडसे म्हणाले आहेत की, ''रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधली होती.

New DGP of Maharashtra
NCP Chintan Shibir : आरक्षण, मोदी सरकार, तपास यंत्रणा, निवडणुका आणि जागावाटप...; शरद पवार सगळ्याच मुद्दयांवर स्पष्ट बोलले

एक प्रकारे ही रक्षाबंधनाची भेट आहे.''

ते म्हणाले आहेत की, ''महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच सरकार आल्यानंतर रश्मी शुक्ला यांची बढती होईल, हे माहित होतं. त्यांनी माझा फोन टॅप केला होता. मला न विचारता. आपल्या सरकारमध्ये आपले ऐकणारे अधिकारीही हवे आहेत. आता पोस्टींग मिळाली, पूर्वी अनधिकृत पण आता अधिकृतपणे फोन टॅप होतील. विरोधकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com