NCP Chintan Shibir : आरक्षण, मोदी सरकार, तपास यंत्रणा, निवडणुका आणि जागावाटप...; शरद पवार सगळ्याच मुद्दयांवर स्पष्ट बोलले

Sharad Pawar : ईडी, सीबीआय या सगळ्या यंत्रणांचे वापर करत हा विरोधकांना त्रास दिला जातो. संजय राऊत यांना अटक करण्यात आली. अनिल देशमुख यांनाही त्रास दिला. आता दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याची नोटीस दिलीय, असं शरद पवार राष्ट्रवादी मेळाव्यात म्हणालेत.
Sharad Pawar
Sharad Pawar Saam Tv
Published On

Sharad Pawar Comment On BJP In NCP Chintan Shibir :

मोदींना बाजुला हटवणं हाच एकमेव विचार असल्याचं राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी म्हणालेत. भाजपला आणि मोदींना दूर करण्यासाठी आपण एकट्याने नाहीतर आपण सहकार्यांच्या सोबतीने निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. यासाठी प्रकाश आंबेडकर यांना आपण इंडियाच सामील करुन घेण्याबाबत आपण बोलणार असल्याचं शरद पवार म्हणालेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते. (Latest News)

शिर्डीमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) शिबीरात शरद पवार (Sharad Pawar) यांनी मार्गदर्शन केले. मागच्या काही दिवसांपासून पक्षातील कार्यकर्ता अस्वस्थ होता. त्यांच्या मनात पक्षाचा विचार पक्का करावा यासाठी शिबिर आयोजित करण्यात आल्याचं पवार म्हणाले. देशातील चित्रं वेगळं आहे. भाजपच्या हातात सत्ता आहे. त्याशिवाय आक्रमक प्रचार यंत्रणा त्यांनी उभी केलीय. जर्मनीत जशी हिटलरची प्रचार यंत्रणा होती असं काम भाजपच्या वतीने सुरू असल्याचे पवार यावेळी म्हणाले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजप ईडी, सीबीआय आदी तपास यंत्रणांचा वापर विरोधकांना त्रास देण्यासाठी करत आहे. खोट्या प्रकरणात नेत्यांना अटक केली जात असल्याचं शरद पवार म्हणालेत. अनिल देशमुख, संजय राऊत यांना यंत्रणांचा वापर करून त्रास देण्यात आला. खोटे आरोप करून संजय राऊत यांची अटक करण्यात आली. आता दिल्लीमध्ये तेच चालू आहे.

यावेळी बोलताना शरद पवार यांनी भाजपच्या दोन निवडणूक घोषणांची हवा काढली. मोदी की गॅरंटी आणि फिर मोदी सरकार अबकी बार ४०० पार अशा घोषणा देऊन भाजपने लोकसभेच्या निवडणुकीचं रणशिंग फुकलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात बोलताना शरद पवार यांनी या घोषणाची हवा काढली. ज्यावेळी मोदी म्हणतात मोदी गॅरंटी है असं म्हणतात पण ती काही खरे नाही. त्याचा अनुभव अनेकदा आलाय”,असा टोला शरद पवारांनी लगावला.

शरद पवारांनी याचे काही उदाहरणे देत मोदींची गॅरंटी कशी फसवी हे सिद्ध करून दिलं. मोदींवर टीका करताना शरद पवार म्हणाले, “मोदी संसदेत क्वचितच येतात. त्यावेळी ते एखाद्या धोरणाची मांडणी अशी करतात ते एकूण संसदेतले सदस्यही काही वेळासाठी थक्क होतात. खूप घोषणा करतात. २०१६-१७ या काळातला अर्थसंकल्प संसदेत मांडला. त्यात २०२२ पर्यंत देशातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट केलं जाईल. आता २०२४ आले पण काहीच घडले नाही. २०२२ पर्यंत शहरी भागातल्या लोकांना पक्की घरं दिली जातील, अशी घोषणा मोदींनी केली होती पण ही घोषणा हवेत विरली.

कशा येणार चारशे पार जागा

भाजप नेत्यांनी ४०० पारचा प्रचार चालू केला. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, अनेक राज्यात भाजपचं सरकार नाहीये. दक्षिणेत भाजप नाही. काही राज्य असे आहेत जिथे भाजप आहे. मात्र ते स्वत: च्या बळावर नाहीत. गोव्यात काँग्रेसचे सरकार होत तिथे आमदार फोडण्यात आले आणि भाजपने सत्ता हिसकावून घेतली. दरम्यान देशात भाजपला अनुकूल वातावरण नाहीये असं पवार म्हणाले.

Sharad Pawar
Election: महायुतीचा लोकसभेसाठी महिला उमेदवार घोषित? चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा, बच्चू कडूंना धक्का

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com