(अमर घटारे)
लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकांच्या तयारीसाठी अनेक राजकीय पक्षांनी आणि आघाड्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत सरळ लढत असेल आहे. दरम्यान भाजपने लोकसभेसाठी आपला पहिला उमेदवार ठरवलाय. पण यामुळे बच्चू कडूंना भाजपने धक्का दिल्याचं म्हटलं जात आहे. (Latest News)
भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी एका कार्यक्रमांमध्ये महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर केला. अमरावती लोकसभेसाठी खासदार नवनीत राणा त्यांच्या नावाची चक्क घोषणा करून टाकली. मात्र कालच प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभेची जागा आम्हाला सोडावी किंवा नवनीत राणा (Navneet Rana) यांनी प्रहारच्या तिकीटावर लढावं, असा इशारा दिला होता. त्यामुळे आता महायुतीमध्ये जागा वाटपावरून मिठाचा खडा पडणार की काय, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कालच प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभेत आपल्याकडे दोन आमदार असल्यास सांगत अमरावती लोकसभेची जागा आम्हाला मिळावी किंवा खासदार नवनीत राणा यांनी प्रहारच्या तिकिटावर लढावं, अशा इशाराच महायुतीला दिल्याने महायुतीला दिला होता. यामुळे महायुतीलचं टेन्शन वाढलं होतं.
मात्र बच्चू कडूंनी महायुतीला अमरावतीच्या जागेवरून इशारा दिल्यानंतर महायुती एकदमच अलर्ट मोडवर आल्याचा दिसून आलं. त्यांच दिवशी सायंकाळी एका खासगी कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती लोकसभेच्या जागेसाठी महायुतीचा पहिला उमेदवारच जाहीर केला. यासाठी अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा ह्या महायुतीच्या उमेदवार, असेल असे त्यांनी यावेळी सांगून टाकल.
नवनीत राणा यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले. आमच्या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, यासाठी रवी राणा यांनी २०१४ मध्ये विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला होता. तर २०१९ मध्ये मी सुद्धा मोदीजींना पाठिंबा दिला तेव्हाही आम्ही सोबत होतो आणि उद्या आम्ही सोबत राहू असे त्यावेळी त्यांनी सांगितलं.
नवनीत राणा कमळाच्या तिकीटावर लढणार का?
यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते की, येणाऱ्या लोकसभेमध्ये अमरावतीच्या जागेवर कमळ या चिन्हाचा उमेदवार असेल. मात्र आज नवनीत राणा यांना विचारलं असता आम्ही यापूर्वी अपक्ष लढलो आणि आम्ही युतीचे घटक म्हणून युतीसोबत आहोत. ते सगळे निर्णय महायुतीमध्ये घेतल्या जाईल. आमदार (MLA) रवी राणा (Ravi Rana) जागा वाटपामध्ये आपल्या पक्षासाठी जागा मागतील. त्यामुळे नवनीत राणा कमळाच्या चिन्हावर लढेल की भाजपच्या पाठिंबावरील असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
एकीकडे आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीच्या लोकसभेच्या जागेवर दावा केला असताना शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसुळ यांनी सुद्धा या जागेवर आपला दावा केला, मात्र महायुतीमध्ये जो वाकड चालेल त्याला आम्ही सरळ करू, असा इशारा रवी राणांनी काल बच्चू कडूना दिला होता. आता चक्क भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीच्या लोकसभेच्या जागेसाठी उमेदवार जाहीर केल्याने महायुतीमध्ये रस्सीखेच होताना दिसून येत आहे. महायुतीच मिठाचा खरा पडेल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.