Gen Alphaची एन्ट्री! शाळेच्या निवडणुकीत थेट मुख्यमंत्रीपदाची बाजी

Gen Alpha Student In Politics : GEN झीचा जलवा साऱ्या देशानं पाहिला. आता जेन अल्फाही मैदानात उतरलीय. अल्फा जनरेशननं थेट निवडणुकीच्या रणधुमाळीत आपला जलवा दाखवलाय. नेमकी कुठे झालीय ही निवडणूक ? आणि कोण पहिली जेन अल्फा मुख्यमंत्री झालीय ? पाहूयात यावरचा हा विशेष रिपोर्ट.
Gen Alpha Student  In Politics
Gen Alpha Student In Politics
Published On

अंगावर गुलाल. कपड्यावर गुलाल. डोक्यावर गुलाल अन् ज्याला डोक्यावर घेवून नाचत्यात त्याच्याबी डोक्यावर गुलाल. ही हाय झेन झीच्या पुढची पीढी झेन अल्फा. मग असणारच की थोडी फॉर्डवर्ड. झेन झीनं सरकारला हादरा दिला. पण झेन अल्फानं स्वत:चंच सरकार उभारलंय. ह्यो जल्लोष त्याचाच हाय चमकल्या का नाय डोसक्यात चांदण्या.

Gen Alpha Student  In Politics
नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष बैठकांचा धडका

त्याचं झालं असं फुलंब्रीच्या पाथ्री गावात राजर्षी शाहू विद्यालयात निवडणुका घ्यायचं ठरलं ती बी बॅलेटवर म्हणजी मतपत्रिकेवर. अत्यंत शांत आणि लोकशाही पद्धतीनं निवडणुका झाल्या. उमेदवार निवडून आलं. मुख्यमंत्री बी ठरला. सगळ्यांच्या निवडीनं मुख्यमंत्रीपदाचा मान एका मुलीला मिळाला. आपल्या राज्याची स्थापना झाल्यापासनं भल्या भल्यांना जी जमलं नाय ती झेन अल्फानं करुन दावलंय. पहिली महिला मुख्यमंत्री देऊन. असं वाटतंय या पोरांवरनी जीव ओवाळून टाकावा.

Gen Alpha Student  In Politics
School Homework:विद्यार्थ्यांना मोबाईलवर अभ्यास देण्यावर बंदी; रत्नागिरीतील सर्व शासकीय आणि खासगी शाळांसाठी नियम लागू

एकीकडं लोकशाहीला काहीजण लपूव छपून विरोध करत्यात पण जोवर अशी झेन अल्फा सारखी पीढी हाय तोवर कुणाचा पप्पा जरी आलं तरी लोकशाही संपायची नाय. थोडक्यात काय तर ही लोकशाहीचा विजय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com