उपचाराला दिरंगाई? आई-बाळाचा मृत्यू; ग्रामीण रुग्णालयावर गंभीर आरोप

Baby Dies Before Delivery, Mother Succumbs To Bleeding In Gadchiroli: गडचिरोलीच्या चामोर्शी येथे 21 वर्षीय गर्भवती महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी उपचारात विलंबाचा आरोप केला असून आरोग्य विभागाने आरोप फेटाळले आहेत.
Chamorshi mother death
Chamorshi mother deathsaam tv
Published On

गणेश शिंगाडे, साम टीव्ही

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात एका गर्भवती महिलेचा आणि तिच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. जामगिरी येथील 21 वर्षीय जिजा हंसराज सातर यांना प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र वेळेवर उपचार न झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे, तर आरोग्य विभागाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. जामगिरी येथील 21 वर्षीय जिजा सातर यांना रविवारी पहाटे 5 वाजता पोटात दुखू लागल्याने चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार सकाळी 9 वाजता प्रसूतीकळा सुरू झाल्या, काही वेळात प्रसूती होईल असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र प्रसूती झालीच नाही आणि त्रास वाढत गेला.

Chamorshi mother death
Shocking : वैद्यकीय क्षेत्रात खळबळ! फ्रॅक्चर पायाचं, पण डॉक्टरांनी केली हृदयाची अँजिओप्लास्टी; महिलेचा मृत्यू

कुटुंबीयांनी चामोर्शीतच सिझर करण्याची विनंती केली, पण सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास तिला गडचिरोलीच्या महिला व बाल रुग्णालयात रेफर करण्यात आले. गडचिरोलीला पोहोचताच बाळाचे ठोके बंद झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रसूतीनंतर अतिरक्तस्राव झाल्याने जिजा सातर यांची प्रकृती खालावली आणि सायंकाळी 5 वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सकाळी पाच वाजता भरती करूनही अकरा वाजेपर्यंत काही उपचार करण्यात आले नाहीत. डॉक्टर आलेले नव्हते आणि डॉक्टर आल्याशिवाय रेफर करता येणार नाही, असे नर्सने सांगितले. असे मृत महिलेच्या पतीने सांगितले. या घटनेनंतर चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. गर्भधारणेच्या तिसऱ्या महिन्यापासून तपासणी याच रुग्णालयात सुरू होती, मात्र सोनोग्राफीसाठी नेहमी खासगी क्लिनिकमध्ये पाठवले जात असल्याची तक्रारही कुटुंबीयांनी केली आहे. मात्र हे सर्व आरोप रुग्णालय प्रशासनाने फेटाळले आहेत.

Chamorshi mother death
Shocking : धक्कादायक! सासऱ्याच्या धक्क्याने खाली पडून सुनेचा मृत्यू; ८ महिन्यांची चिमुकली आईविना पोरकी

डॉक्टर उपलब्ध नव्हते हा चुकीचा आरोप आहे. तिची प्रसुतीची वेळ झालेली नव्हती. पूर्ण वेळ होईपर्यंत ग्रामीण रुग्णालयात वाट पाहण्यात आली. प्रसुती झाली नाही म्हणून तिला गडचिरोलीला रेफर करण्यात आले. असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण किलनाके यांनी सांगितले.

Chamorshi mother death
60 लाखांचं पॅकेज, 2 जुळी मुलं; इंजिनिअरच्या हत्येचं सासुरवाडी कनेक्शन आलं समोर...

महिलेला चामोर्शी येथेच प्रसुती व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, प्रसुती न झाल्याने तिला महिला व बाल रुग्णालयात रेफर करण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न केले; मात्र अतिरक्तस्रावामुळे महिलेचा मृत्यू झाला. असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी सांगितले.

एकंदरीत आरोग्य विभाग उपचारात कसूर झाली नाही असा दावा करत असला, तरी एका 21 वर्षीय मातेने पोटातील बाळासह जीव गमावल्याने ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे पुन्हा एकदा निघाले आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com