60 लाखांचं पॅकेज, 2 जुळी मुलं; इंजिनिअरच्या हत्येचं सासुरवाडी कनेक्शन आलं समोर...

Delhi Techie Dies After Wife Returns With Family: दिल्लीतील 31 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर विनय यांच्या मृत्यू प्रकरणात पत्नी आणि तिच्या कुटुंबातील चार जणांना अटक. 60 लाखांचे पॅकेज, जुळी मुले आणि कौटुंबिक वादानंतर घडलेल्या घटनेचा तपास सुरू.
₹60 Lakh Package, Twins, Family Feud
₹60 Lakh Package, Twins, Family Feudsaam tv
Published On

दिल्लीतील निहाल विहार येथे 31 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर विनय यांच्या मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाला औषध देण्याच्या मुद्द्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्यानंतर पत्नी घराबाहेर गेली आणि 10 मिनिटांनी ती परत आली. मात्र यावेळी ती एकटी नव्हती. तिच्यासोबत माहेरचे लोकही आले होते. काही वेळानंतर शेजारी विनय यांना खांद्यावर उचलून घराबाहेर घेऊन जाताना दिसला. विनय यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी विनय यांची पत्नी रेखा, तिचे दोन भाऊ आणि तिच्या वाहिनीला अटक केली आहे. विनय यांच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर हत्या केल्याचा आरोप केला आहे.

₹60 Lakh Package, Twins, Family Feud
Crime: माझ्यापेक्षा मुलीवर जास्त प्रेम करते, तरुणाने जन्मदात्या आईला संपवलं, नवी मुंबईतील संतापजनक घटना

विनय हे 31 वर्षांचे होते आणि आयटी क्षेत्रात कार्यरत होते. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, त्यांचे वार्षिक पॅकेज सुमारे 60 लाख रुपये होते. सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी त्यांचा बुध विहार येथील रेखा हिच्याशी विवाह झाला होता. या दाम्पत्याला जुळी मुले असून त्यात एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मात्र, विनय यांच्या कुटुंबीयांचा दावा आहे की, लग्नानंतर दोघांमध्ये नाते व्यवस्थित नव्हते. छोट्या-छोट्या कारणांवरून वाद होत असायचे. रेखाचे विनय यांच्या आईसोबतही वाद होत असल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे. तसेच रेखाच्या भावाकडून विनय यांना धमक्या मिळत असल्याचाही आरोप कुटुंबानी केला. विनय यांच्या आईच्या म्हणण्यानुसार, मुलाला औषध देण्याच्या मुद्द्यावरून विनय आणि रेखा यांच्यात वाद झाला. वाद वाढल्यानंतर विनय यांनी मोठ्या आवाजात बोलल्याने रेखा नाराज होऊन घराबाहेर गेली.

₹60 Lakh Package, Twins, Family Feud
Crime : घर दाखवण्याच्या बहाण्याने झुडपात नेलं अन् ७ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार; शेजाऱ्याचं भयंकर कृत्य

आणि 10 मिनिटांनी रेखा परत आली. मात्र, तिच्यासोबत तिचे दोन भाऊ, भावजय, वडील आणि अन्य एक व्यक्ती असे अनेक जण होते. या प्रकरणातील एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. त्यात रेखा लाल रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत असून, तिच्यासोबत तिची भावजय निळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये आहे. कारजवळ रेखाचे दोन भाऊ, वडील आणि अन्य एक व्यक्तीही दिसत आहेत. यानंतर घरात नेमके काय घडले, हे पोलिस तपासातून स्पष्ट होणार आहे. मात्र, विनय यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, सासरच्या मंडळींनी घरात त्यांच्यासोबत मारहाण केली.

₹60 Lakh Package, Twins, Family Feud
Kalyan Crime: कल्याण हादरले! डोक्यावर वार करत तरुणीने बॉयफ्रेंडला संपवलं, मृतदेह गोणीत भरून २४ तास पाण्यात ठेवला

विनय यांनी सासरच्या मंडळींसाठी पाणीही आणले होते. मात्र, त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. विनय यांचा गळा दाबण्यात आला आणि त्यांच्या छातीवर हाताने तसेच पायाने मारहाण करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. घटनेच्या वेळी विनय यांचे आई-वडीलही तेथे उपस्थित होते. त्यांनी मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची प्रकृती बिघडत गेल्याचा कुटुंबीयांनी दावा केला. काही वेळानंतर एक शेजारी विनय यांना खांद्यावर उचलून घराबाहेर घेऊन जाताना दिसला. विनय स्वतःच्या पायावर उभे राहू शकत नव्हते. शेजाऱ्याने त्यांना खुर्चीवर बसवले आणि त्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही. पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक केली असून, त्यात विनय यांची पत्नी रेखा, तिचे दोन भाऊ आणि एका भावजयाचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com