समृद्धी महामार्गावर मध्यरात्री थरार! महाराष्ट्र शासनाचा फलक, सायरन अन् आलिशान कार; कांद्याचा ट्रक लुटून चौघे पसार

Samruddhi Expressway: समृद्धी महामार्गावर कांद्याने भरलेला ट्रक लुटल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली. महाराष्ट्र शासन असा फलक आणि सायरन लावलेल्या स्कोडा कारमधून आलेल्या चौघांनी ट्रक चालकाला मारहाण करून ट्रक पळवला.
SAMRUDDHI EXPRESSWAY ONION TRUCK ROBBERY
SAMRUDDHI EXPRESSWAY ONION TRUCK ROBBERYsaam tv
Published On: 

संजय जाधव, साम टीव्ही

समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नाशिकहून कांदा घेऊन झारखंडच्या दिशेने जाणारा ट्रक चक्क चौघांनी लुटून नेल्याची घटना बुलढाणा जिल्हयात घडली आहे. महाराष्ट्र शासन असा फलक आणि सायरन लावलेल्या आलिशान स्कोडा कारमधून आलेल्या चौघांनी ट्रक अडवून चालकाला मारहाण केली आणि ट्रक घेऊन पसार झाले. ही घटना डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर मध्यरात्री घडली. नाशिकहून झारखंडकडे कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रकला स्कोडा कारमधून आलेल्या चौघांनी अडवलं. यावेळी आरोपींनी ट्रक चालकाला बेदम मारहाण केली आणि त्याला महामार्गावरच सोडून ट्रक घेऊन फरार झाले.

SAMRUDDHI EXPRESSWAY ONION TRUCK ROBBERY
मुंबईत थरार! भरधाव कारनं 20 जणांना उडवलं, महिला वकिलाचा जागीच मृत्यू; कार चालकाला VIP ट्रीटमेंट?

जखमी ट्रक चालकाने तातडीने 112 या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. बुलढाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी चालकाला रुग्णवाहिकेतून मेहकर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलिसांनी समृद्धी महामार्गाच्या कंट्रोल रूमला माहिती देत ट्रकचा शोध सुरू केला. काही तासांतच पोलिसांनी ट्रक आणि स्कोडा कारसह चारही आरोपींना वाशिम जिल्ह्यात पकडलं. आरोपींना अटक करून मेहकर न्यायालयात हजर करण्यात आलं आहे.

SAMRUDDHI EXPRESSWAY ONION TRUCK ROBBERY
Accident News: भरधाव कारने मुलाला चिरडलं; 9 वर्षाच्या चिमुरड्याचा जागीच मृत्यू, मुंबईतील थरारक घटना

या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपींच्या स्कोडा कारवर ‘महाराष्ट्र शासन’ असा फलक आणि सायरन लावण्यात आला होता. त्यामुळे शासनाच्या वाहनाचा आभास निर्माण करून त्यांनी ट्रक अडवल्याचा संशय आहे. या वाहनाची महामार्गावर तपासणी कशी झाली नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या चार आरोपींपैकी एक आरोपी बांगलादेशी असल्याची माहिती आहे, तर अन्य तीन आरोपी नाशिक जिल्ह्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे. या माहितीची पोलिसांकडून अधिकृत पडताळणी सुरू आहे.

SAMRUDDHI EXPRESSWAY ONION TRUCK ROBBERY
Raju Shetty News | राजारामबापू साखर कारखान्यावरील आंदोलन स्थगित !

समृद्धी महामार्गावर यापूर्वीही वाहनचालकांना अडवून मारहाण आणि लुटमारीच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या घटनेनंतर महामार्गावरील वाहनं आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com