sufi khwaja syed zarif chishti, nashik news,
sufi khwaja syed zarif chishti, nashik news, saam tv

Nashik : अफगाणी धर्मगुरू खून प्रकरण; चौघे अटकेत

नाशिक ग्रामीण पाेलीसांनी केला खूनाचा तपास.
Published on

- तबरेज शेख

नाशिक : नाशिक (nashik) जिल्ह्यातील येवला परिसरात मुस्लिम धर्मगुरू सुफी ख्वाजा सय्यद जरीफ चिस्ती (sufi khwaja syed zarif chishti) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनं देशात एकच खळबळ उडाली होती. सुरवातीला ही हत्या धार्मिक वादातून झाल्याची चर्चा पसरली मात्र नाशिक ग्रामीण पोलिसांनी (police) या प्रकरणाचा मोठ्या शिताफीने तपास करत चार संशयित आरोपींना अटक (arrest) केली आहे. (sufi khwaja syed zarif chishti latest marathi news)

नाशिक ग्रामीण पोलिसांनी (nashik police) दिलेल्या माहितीनूसार चारही संशयित आरोपींनी खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. धर्मगुरू सुफी ख्वाजा सय्यद जरीफ चिस्ती यांचा खून हा मालमत्तेच्या कारणास्तव करण्यात आला आहे अशी प्राथमिक माहिती उपलब्ध झाल्याचे पाेलीसांनी स्पष्ट केले.

sufi khwaja syed zarif chishti, nashik news,
Shirdi News : शिर्डीतील व्‍दारकामाई मंदिराची दर्शन वेळ बदलली; जाणून घ्या नवा निर्णय

धर्मगुरू सुफी ख्वाजा सय्यद जरीफ चिस्ती यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. ही मालमत्ता हडप करण्यासाठी हा खून झालेला आहे. या प्रकरणी गफार खान, गणेश झिंजाट, रवींद्र तोरे, पवन आहेर या चाैघांना अटक करण्यात आल आहे. या प्रकरणातील आणखी दोघांचा शाेध सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील (superintendent of police sachin patil) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

sufi khwaja syed zarif chishti, nashik news,
Rain Update : महाराष्ट्र- तेलंगणा मार्ग बंद; चंद्रपूरात अकरा हजार हेक्टर शेतीस फटका
sufi khwaja syed zarif chishti, nashik news,
Satara Rain : सावधान ! उरमाेडी धरणातून दाेन हजार क्युसेक पाणी साेडले जाणार
sufi khwaja syed zarif chishti, nashik news,
'त्या' घटनेनंतर गाैरवची भावना; 'थप्पड़ से नहीं साहब…, बीवी की सरप्राइज प्लानिंग से डर लगता है...'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com