सातारा : सातारा (satara) जिल्ह्यात आणि कोयना धरण (koyna dam) क्षेत्रात काल पासून पावसाचं (rain) प्रमाण थोड्या प्रमाणात ओसरले आहे. त्यामुळे धरणात येणारे पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या 24 तासात धरणातील पाणी साठयामध्ये 3.87 टीएमसीने वाढ झाली आहे. दरम्यान आज सकाळी अकरा वाजता उरमाेडी धरणातून उरमाेडी नदीत पाणी साेडले जाणार आहे अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने दिली. (satara rain update)
उरमोडी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस असलेने धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. धरणातील पाणी पातळी निर्धारित पाणी पातळी पेक्षा अधिक झाल्यामुळे सांडव्यावरील वक्रद्वारामधून उरमोडी नदीपात्रात आज (शुक्रवार) सकाळी अकरा वाजता दाेन हजार क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात येणार आहे. उरमोडी नदीकाठावरील गावातील सर्व ग्रामपंचायत प्रशासन, ग्रामस्थ यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ग्रामस्थ, शेतकरी आदींनी कोणत्याही कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करू नये असे देखील प्रशासनाने कळविले आहे.
वीर धरण उजवा कालवा विद्युतगृहातुन 1400 क्यूसेक व डावा कालवा विद्युतगृहातुन 300 क्यूसेक विसर्ग आज (शुक्रवार) साडे दहाच्या सुमारास नदीपत्रात सुरू करण्यात येणार आहे. वीर धरणाच्या सांडव्यातून सध्या विसर्ग सुरू करण्यात येणार नाही असेही प्रशासनाने कळविले आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी. नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी तसेच नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये. ग्रामस्थांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कोयना धरण अपडेट
सातारा जिल्ह्यात आणि कोयना धरण क्षेत्रात काल पासून पावसाच प्रमाण थोड्या प्रमाणात ओसरले आहे. त्यामुळे धरणात येणारे पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या 24 तासात धरणातील पाणी साठयामध्ये 3.87 टीएमसीने वाढ झाली आहे.
कोयना धरण पाणी साठा - 47.05 टीेएमसी (44.70%)
धरणात येणारे पाणी 46450 क्युसेक
कोयना 107 मिली मीटर
नवजा 59 मिली मीटर
महाबळेश्वर 143 मिली मीटर
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.