Maharashtra Politics: ठाकरेंची साथ सोडलेले माजी मंत्री बबन घोलप आज शिंदे गटात प्रवेश करणार

Baban Gholap Join Shinde Group: सध्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. ठाकरेंची साथ सोडलेले माजी मंत्री बबन घोलप आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
Baban Gholap Join Eknath Shinde Group
Baban Gholap Saam Tv

तबरेज शेख साम टीव्ही, पुणे

Baban Gholap Join Eknath Shinde Group

मागील काही दिवसांपासून बबन घोलप (Baban Gholap) शिवसेनेच्या वाटेवर, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. ठाकरेंची साथ सोडलेले माजी मंत्री बबन घोलप आज शिंदेंच्या शिवसेनेत (Eknath Shinde) प्रवेश करणार आहेत. (latest politics news)

शिर्डी लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख पदावरून हटवल्याने नाराज बबनराव घोलप नाराज असल्याच्या चर्चा आहे. ठाकरे गटाकडून माजी मंत्री शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर ते नाराज (Baban Gholap Join Eknath Shinde Group) होते. शिर्डी लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख पदावरून हटवल्यानंतर त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा दिला होता. (व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

माजी मंत्री बबन घोलप आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चार वाजता पक्षात प्रवेश करणार आहेत. बबन घोलप यांनी यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांचीही भेट (Maharashtra Politics) घेतली होती. घोलप हे पाच वेळेला विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी यापूर्वी समाजकल्याण मंत्री म्हणून त्यांनी कारभार पाहिला आहे.

बबनराव घोलप कोण आहेत ?

शिवसेना आणि भाजप युतीच्या सत्तेच्या काळात बबनराव घोलप १९९५ मध्ये कॅबिनेट मंत्री ( Lok Sabha Election 2024) होते. त्यांच्याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचीही जबाबदारी होती. देवळाली मतदारसंघाचे बबन घोलप पाच वेळा आमदार राहिले आहेत.

Baban Gholap Join Eknath Shinde Group
Bihar Politics : बुढ़ापे में भी तुम्हारा काल बनकर चट्टान की भांति खड़ा हूं,... अटक वॉरंटनंतर लालूप्रसाद यादवांचा जुना Video व्हायरल

सध्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंय ढवळून निघालं आहे. माजी मंत्री बबन घोलप आज (६ एप्रिल) शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आता पुढे काय होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं ( Lok Sabha 2024) आहे. तसेच बबन घोलप यांचा सर्वात जास्त फायदा आता कुणाला होणार, हाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Baban Gholap Join Eknath Shinde Group
Maharashtra Politics : 'तुम्ही जामिनावर बाहेर..कोणत्या तुरुंगात जायचं ठरवून ठेवा'; तिहार जेलवरून नारायण राणे संजय राऊतांमध्ये जुंपली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com