Maharashtra Politics : 'तुम्ही जामिनावर बाहेर..कोणत्या तुरुंगात जायचं ठरवून ठेवा'; तिहार जेलवरून नारायण राणे संजय राऊतांमध्ये जुंपली

Narayan Rane On Sanjay Raut News : नारायण राणे यांच्या ईडी आणि सीबीआयच्या फाईल उघडल्या तर दोन महिन्यात ते तिहार जेलमध्ये जातील, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावरून आता नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यांत चांगलीच जुंपली आहे.
Narayan Rane On Sanjay Raut
Narayan Rane On Sanjay Raut Saam Digital

Narayan Rane On Sanjay Raut

नारायण राणे यांच्या ईडी आणि सीबीआयच्या फाईल उघडल्या तर दोन महिन्यात ते तिहार जेलमध्ये जातील, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावरून आता नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यांत चांगलीच जुंपली आहे. संजय राऊत यांच्या आरोपांचा समाचार घेताना नारायण राणे यांनी, लोकसभा निवडणुकीनंतर संजय राऊतचं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत राहणार नाहीत. तसंच ते जामिनावर बाहेर आहेत, येणाऱ्या काळात त्यांनी कोणत्या जेलमध्ये जायचंय ठरवावं, असा टोला लगावला आहे.

संजय राऊत यांनी आरोप करण्याआधी नारायण राणेंनी व उद्धव ठाकरेंना अटक होणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “जर असं असेल तर मग नारायण राणे कुठे असतील? दोन महिन्यांत सत्ता आमची येते आहे. त्यांच्या ईडी आणि सीबीआयच्या फाईल उघडल्या तर दोन महिन्यात ते तिहार जेलमध्ये असतील .” असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्याचा समाचार घेताना नारायण राणे यांनी, संजय राऊतच लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत राहणार नाहीत. त्याच्या गाठीभेटी होतायेत? कोणाशी बोलणं होतेयं हे शोधलं पाहिजे. शिवसेनेचे पाच खासदार आहेत, मग दोन महिन्यात शिवसेनेचं सरकार कसं येईल हे कोणी सांगू शकेल का, असा टोला त्यांनी लगावला आहे. तिहार जेलमध्ये जायला गुन्हा करावा लागतो. मी कोणताही गुन्हा केला नाही, तेवढी काळजी घेतो. संजय राऊतवर अनेक केसेस सुरू आहेत. ते एक नंबरचे भ्रष्टाचारी आहेत. तसंच ते जामीनावर बाहेर आहेत. त्यांना कोणत्या जेलमध्ये जायचं आहे ते आधी ठरवावं, असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं आहे.

Narayan Rane On Sanjay Raut
Rahul Gandhi: इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? राहुल गांधींनी दिलं उत्तर

नितेश राणेंचा इशारा

मुंगेरीलाल के हसीन सपने पाहणाऱ्या संजय राऊत यांनी नारायण राणे यांची आणि भाजपच्या नेत्यांनी चिंता करू नये. २०२४ ला एनडीएचं सरकार येतय. पोलीस तुमची वाट पाहतायेत आहेत. याची काळजी करा आणि मगच नारायण राणे आणि भाजपच्या नेत्यांवर बोलण्याची हिंमत करा, असा इशारा नितेश राणे यांनी संजय राऊत यांनी दिला आहे.

Narayan Rane On Sanjay Raut
Ratnagiri Sindhudurg Constituency: रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीवरुन विनायक राऊतांची खाेचक टीका, राणेंचा तिस-यांदा पराभव अटळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com