रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात (ratnagiri-sindhudurg lok sabha constituency) नारायण राणे (narayan rane) यांना तिसऱ्यांदा चितपट करण्याची संधी मला लाभणे हे माझे भाग्य समजताे. नारायण राणे यांना सलग तिसऱ्यांदा पराभूत व्हावे लागणार असा विश्वास खासदार विनायक राऊत (mp vinayak raut) यांनी व्यक्त केला. खासदार विनायक राऊत हे आज (शुक्रवार) चिपळूण संगमेश्वर विधानसभा दौ-यावर हाेते. त्यावेळी राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना इंडिया आघाडीचा उमेदवारच काेकणातील जनता निवडून देणार असा निर्धार आजच्या मेळाव्यात केल्याचे राऊत यांनी नमूद केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
खासदार विनायक राऊत म्हणाले विराेधक म्हणून कोणीही येऊ देत किमान अडीच लाखाच्या फरकाने त्याला जनता आपटणार. महायुतीचा उमेदवार 12 तारखेपर्यंत ठरला तरी पुष्कळ आहे असा टाेला राऊत यांनी महायुतीच्या उमेदवार निवडीच्या तिढ्यावर लगावला.
या मतदारसंघात किरण सामंत (kiran samant) हे माझ्यासाठी आव्हानात्मक ठरले असते. नारायण राणे हे माझ्यासाठी आव्हान नाही असेही खासदार राऊत यांनी नमूद केले. ते म्हणाले राणे यांना तिसऱ्यांदा चितपट करण्याची संधी मला लाभणे हे माझे भाग्य आहे. नारायण राणे यांना सलग तिसऱ्यांदा पराभूत व्हावे लागणार हे निश्चित.
दरम्यान कोकणात देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) सिडको आणून जमीन लाटू पाहत आहेत असा आराेप करीत त्याला आमचा विरोध कायम राहणार असे राऊत यांनी स्पष्ट केले. हार्मोनियमचे महत्व निलेश राणे (nilesh rane) यांना कळणार नाही, राडेबाज विकृतीच महत्व त्यांना चांगलं कळतं असा सणसणीत टाेला खासदार विनायक राऊत यांनी निलेश राणेंना लगावला.
(Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.