Bihar Politics : बुढ़ापे में भी तुम्हारा काल बनकर चट्टान की भांति खड़ा हूं,... अटक वॉरंटनंतर लालूप्रसाद यादवांचा जुना Video व्हायरल

Lalu Prasad Yadav Reaction On Arrest Warrant: ग्वाल्हेरच्या खासदार आमदार न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. आता यावर त्यांचा एक जूना व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Lalu Prasad Yadav
Lalu Prasad Yadav Saam Tv

Bihar Politics Lalu Prasad Yadav Viral Video

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात ग्वाल्हेरच्या खासदार आमदार न्यायालयाने ( Gwalior Mp Mla Court) अटक वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे आता बिहारचं राजकारण (Bihar Politics) तापलं आहे. यावर सर्वच स्तरातून राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. आता खुद्द लालू प्रसाद यादव यांची प्रतिक्रिया सोशल मीडियावरून समोर आली आहे. यात त्यांचा एक एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. (latest politics news)

माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावर 1995 आणि 1997 मध्ये बनावट फॉर्म क्रमांक 16 तयार करून कथितरीत्या शस्त्रास्त्रांचा पुरवठा केल्याप्रकरणी आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी लालू यादव यांच्याविरोधात कायमस्वरूपी अटक वॉरंट जारी करण्यात (Lalu Prasad Yadav Arrest Warrant) आलंय. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आता या प्रकरणी त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. (व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लालू प्रसाद यादव यांची ही प्रतिक्रिया मायक्रो ब्लॉगिंग साइट X वर आली आहे. त्यांनी जुन्या मुलाखतीचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ”मूली थोड़े हैं कि उखाड़ के फेंक दोगे. (Lalu Prasad Yadav) लालू प्रासाद यादव नाम है. इस बुढ़ापे में भी तुम्हारा काल बनकर चट्टान की भांति खड़ा हूं, अपने उसूलों पर अड़ा हूं.”

ग्वाल्हेरच्या खासदार-आमदार न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात एक वर्ष जुन्या प्रकरणात कायमस्वरूपी अटक वॉरंट जारी केलं आहे . शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत हे वॉरंट जारी करण्यात आलं (Lalu Prasad Yadav Reaction) आहे. या प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री लालू यादव यांना फरार घोषित करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून शस्त्र विक्रेत्याकडून शस्त्रे खरेदी केल्याचं पोलीस तपासात उघड झालं (Lalu Prasad Yadav Reaction Viral) आहे.

Lalu Prasad Yadav
Maharashtra Politics : 'तुम्ही जामिनावर बाहेर..कोणत्या तुरुंगात जायचं ठरवून ठेवा'; तिहार जेलवरून नारायण राणे संजय राऊतांमध्ये जुंपली

कागदपत्रात नमूद केलेले लालू यादव हे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री असल्याची न्यायालयाला खात्री पटली. त्यानंतर लालू यादव यांच्याविरुद्धचा हा खटला खासदार-आमदार न्यायालयात वर्ग करण्यात आला (Lalu Prasad Yadav News Update) होता. ग्वाल्हेरचे खासदार-आमदार न्यायालयाचे एडीपीओ अभिषेक मेहरोत्रा ​​यांनी सांगितलं की, विशेष न्यायदंडाधिकारी खासदार-आमदार ग्वाल्हेर महेंद्र सिंह यांच्या कोर्टातून आरोपी लालू प्रसाद यादव यांच्यासाठी कायमस्वरूपी अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

Lalu Prasad Yadav
Konkan Politics: वैभव नाईकांचा पन्नास हजार मताधिक्यांनी पराभव अटळ,निलेश राणेंना निवडून आणणार : किरण सामंत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com