तुकाराम मुंढेंच्या अन्न-औषध प्रशासनाची दणकेबाज कारवाई! तब्बल 4 कोटींच्या बटरच्या साठ्यावर धाड

Ahilyanagar FDA Seizes 75356 Kg Butter Worth Rs 3.95 Crore: अहिल्यानगरच्या निंबळक एमआयडीसीतील अरिहंत कोल्ड स्टोरेजवर अन्न-औषध प्रशासनाची धाड टाकली आहे.
Madhurama Creamy Delight butter quality and labelling investigation
Madhurama Creamy Delight butter quality and labelling investigationsaam tv
Published On

सुशील थोरात, साम टीव्ही

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांच्या तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत अहिल्यानगरच्या निंबळक परिसरातील एमआयडीसी भागातील अरिहंत कोल्ड स्टोरेजवर अन्न-औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ७५ हजार ३५६ किलो पाश्चराइज्ड कुकिंग बटरचा साठा ताब्यात घेण्यात आला असून, या साठ्याची किंमत तब्बल ३ कोटी ९५ लाख ६२ हजार रुपये आहे.

Madhurama Creamy Delight butter quality and labelling investigation
Pune : पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; १६ आस्थापनांचे परवाने निलंबित

‘मधुरामा क्रीमी डिलाईट’ या ब्रँडच्या बटरच्या दर्जा आणि लेबलिंगबाबत संशय निर्माण झाल्यानंतर प्रशासनाकडून रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान विविध बॅचमधील चार बटरचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर बटरचा दर्जा तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले आहे की नाही, हे स्पष्ट होणार आहे.

Madhurama Creamy Delight butter quality and labelling investigation
FDA ची राज्यभर धडक कारवाई; मुंबई क्रिकेट क्लबसह ११ ठिकाणाचे परवाने निलंबित

दरम्यान, संपूर्ण बटरचा साठा सुरक्षितपणे जप्त करून प्रशासनाच्या ताब्यात ठेवण्यात आला आहे. प्रयोगशाळेच्या अहवालात भेसळ, निकृष्ट दर्जा किंवा अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांविरोधात अन्न सुरक्षा कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे. सण-उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न-औषध प्रशासनाकडून तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com