FDA ची राज्यभर धडक कारवाई; मुंबई क्रिकेट क्लबसह ११ ठिकाणाचे परवाने निलंबित

FDA Action Across Maharashtra: महाराष्ट्रात FDA ची राज्यभर धडक कारवाई. 45 हॉटेल, रेस्टॉरंट आणि धाब्यांची तपासणी करण्यात आली. 33 आस्थापनांना सुधारणा नोटीस, तर 11 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.
FDA Action Across Maharashtra
FDA Action In Maharashtra: 11 Food Licences Suspended, Mumbai Cricket Club Also Hitsaam tv
Published On
Summary
  • मुंबई क्रिकेट असोसिएशन परमिट रूमचा अन्न परवाना निलंबित

  • महाराष्ट्रात एफडीएची हॉटेल आणि रेस्टॉरंटवर धडक कारवाई

  • तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएची कारवाई

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात अन्न आणि औषध प्रशासनाकडून राज्यभर धडक कारवाई सुरूय. आज एफडीएच्या पथकाकडून राज्यातील एकूण ४५ हॉटेल, रेस्टॉरंट आणि धाबा यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ३३ आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली. तर ११ आस्थापनांचे परवाने निलंबन करण्यात आली. विशेष म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या परमिट रूमचाही अन्न परवाना निलंबित करण्यात आलाय.

FDA Action Across Maharashtra
तरुणांना दिशा दिली तर देश जगात पावरफुल बनेल; Gen-Z बाबत काय म्हणाले IAS तुकाराम मुंढे?

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे परमिट रूम येथे FDA अधिकाऱ्यांनी तपासणी केली. या तपासणीत किचनमधील एका फ्रीजमध्ये बर्फ साचलेला आढळून आला. किचनच्या प्रवेशद्वाराजवळील फरशी अस्वच्छ आढळली. FSSAI परवाना प्रमुख ठिकाणी प्रदर्शित केलेला नव्हता. यासह खाद्यतेलाचा रंग, वास आणि इतर घटकांच्या आधारे करण्यात येणारी नियमित तपासणी केली जात नव्हती. कृषीजन्य कच्चा माल खराब अवस्थेत आढळला. कर्मचारी स्वच्छता आणि सॅनिटेशन व्यवस्थेचे पालन अपेक्षित निकषांनुसार करत नसल्याचे या पाहणीत निदर्शनास आले. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने त्यांचा परवाना निलंबित केलाय.

FDA Action Across Maharashtra
'आधी गोळी झाडायची, नंतर प्रश्न विचारायचे, हे खपवून घेणार नाही; उच्च न्यायालयानं FDAला फटकारलं

कुर्ला येथील संकल्प महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेवरही एफडीएनं कारवाई केलीय. अन्नसुरक्षा निकषांच्या पालनाबाबत गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या. या तपासणीत अन्न तयार करण्याचा परिसर स्वच्छ व आरोग्यदायी स्थितीत नव्हता. परिसरात घाण, अन्नाचे अवशेष आणि अपुरी स्वच्छता आढळली. भिंती, छत व इतर भागांवर डाग, घाण, ग्रीस व झीज आढळून आली. आस्थापनेतील अंतर्गत पृष्ठभाग व फिटिंग अस्वच्छ व खराब अवस्थेत होत्या.

दादर येथील शिवाजी पार्कच्या Cafe Cadell येथेही अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. किचनमध्ये अस्वच्छता, दरवाजे गुळगुळीत झालेले, किटकांचा प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना न करणे, कर्मचाऱ्यांची हात धुण्याची सुविधा, स्वच्छतागृहे आणि इतर अपुऱ्या सुविधा आढळून आल्या. शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थ योग्यप्रकारे वेगळे ठेवले जात नव्हते, हे तपासणीत निदर्शनास आल्यानंतर कॅफेचा परवाना निलंबित करण्यात आला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com