Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर ६ जणांनी धाड धाड गोळ्या झाडल्या, २४ तासांत अकोला कनेक्शन आले समोर, वाचा

Rohit Shetty house firing : दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी सोशल मीडियावर स्वीकारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात अकोला कनेक्शन समोर आले.
Rohit Shetty House Firing:
Rohit Shetty House Firing:Saam TV
Published On

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

firing outside Rohit Shetty residence Mumbai : दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झालीये. लॉरेन्स बिश्नोई टोळीतील शुभम लोणकर या सदस्याने या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारलीये. शुभम लोणकर  आरजू बिश्नोई तो त्याच्या पोस्टमध्ये लिहित, 'मुंबईतील दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेतलीय..

कोण आहे शुभम लोणकर?

याआधी राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची आणि आता रोहीत शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणारा शुभम लोणकर. शुभम लोणकर हा मूळ अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील नेव्होरी गावाचा रहिवासी आहेय. या आधीही शुभम लोणकर याच्यावर अकोला पोलिसांनी कारवाई करत तब्बल 3 पिस्टलसह काही जिवंत काडतूस त्याच्याकडून जप्त केल्या होत्या. लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असणाऱ्या शुभम लोणकरला बंदुकीच्या तस्करी प्रकरणात अकोला पोलिसांनी गजाआड केले होते. शुभम हा बंदूक तस्करीचा मुख्य सूत्रधार होताये. अकोट पोलिसांनी त्याच्याकडून बंदूक खरेदी करणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या होत्या. 'तो' गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील वार्जे शहरात रहायचा, त्यानंतर तो फरार होता. त्यावेळी शुभमला पुण्यातून अटक झाली होती त्यानंतर त्याची जमिनावर सुटका झाली होती.

Rohit Shetty House Firing:
Accident : कारची दुचाकीला जोरात धडक, एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराचा जागेवरच मृत्यू, शिवसेनेवर शोककळा

शुभम लोणकर आणि लॉरेन्स बिश्नोई या दोघांच्या संभाषणाचं कॉल रेकॉर्डिंग पोलिसांकडे आहे. शुभम आणि बिश्नोई यांच्या संभाषणाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा समोर आले होते. शुभमचे नेटवर्क दुबई आणि इतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांपर्यंत पसरले आहेये. त्यांचं अकोल्यातील नेव्होरी गांवात घर असून त्याच्या घराला अनेक दिवसांपासून कुलूप लागलं आहेय.

Rohit Shetty House Firing:
TDP workers : मुख्यमंत्र्यांबद्दलचं ते विधान भोवलं, माजी मंत्र्यांच्या घरावर हल्ला, तोडफोडीनंतर जमावाने लावली आग

रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेणाऱ्या पोस्टमध्ये म्हटलंय....

या पोस्टमध्ये म्हटलंये की 'आम्ही त्याला अनेक वेळा मेसेज केला आहे की आमच्या कामात हस्तक्षेप करणं थांबवा, पण तो समजत नाहीये. हा फक्त एक छोटासा ट्रेलर आहे. जर त्याला आमचा निरोप पुढं समजला नाही, तर त्याला त्याच्या घराबाहेर नाही तर त्याच्या बेडरुममध्ये, त्याच्या छातीत गोळ्या घातल्या जातील. हा संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला इशारा आहे. पुढं लिहीत म्हटलंय की 'वेळेत सुधार, नाहीतर तुझे खूप हाल होतील. 'बाबा सिद्दीकी'पेक्षाही वाईट हाल करु. आम्ही ज्यांना ज्यांना फोन केला आहे, वेळेत सुधारा, नाहीतर तुम्हाला लपण्याची जागा कमी पडेल. तू आणि आमचे सर्व शत्रू, तयार राहा. लवकरच भेटू..

Rohit Shetty House Firing:
पुणे हादरलं! आईनं २ लेकरांसह मृत्यूला कवटाळलं, नवऱ्याच्या त्या कृत्यानं माऊलीने उचलले टोकाचं पाऊल

बाबा सिद्दीकींच्या खुनाची स्वीकारली होती जबाबदारी....

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या मुंबईमध्ये गोळ्या झाडून हत्या झाली होती. त्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली. त्यावेळी शुभम लोणकर याने हत्येची जबाबदारी घेणारी पोस्ट सोशल मीडियावर केली होती.

Rohit Shetty House Firing:
सांगलीत भयंकर अपघात, भरधाव कारने ४ पोलिसांसह १५ जणांना उडवले, पाहा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com