पुणे हादरलं! आईनं २ लेकरांसह मृत्यूला कवटाळलं, नवऱ्याच्या त्या कृत्यानं माऊलीने उचलले टोकाचं पाऊल

Domestic violence cases in Maharashtra : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात घरगुती कलह आणि पतीकडून होणाऱ्या मानसिक छळामुळे ३० वर्षीय महिलेने दोन चिमुकल्या मुलांसह आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
Pune Shirur crime
Pune Shirur crime Saam TV Marathi
Published On

रोहिदास घाडगे, पुणे प्रतिनिधी

Pune crime news today : पुण्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली. एका माऊलीने आपल्या दोन चिमुकल्यांसह आयुष्याचा शेवट केला. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहर हादरले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही महिला गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक कलहामुळे प्रचंड तणावाखाली होती. दारूच्या नशेत पतीकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला महिला कंटाळली होती. त्यामुलेच ३० वर्षांच्या महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. मृत महिलेचे नाव भाग्यश्री जाधव असे आहे.

घरगुती कलह आणि मानसिक छळामुळे निराश झालेल्या आई भाग्यश्री जाधव हिला दोन मुलांसह जीवन संपवण्याची वेळ पतीमुळे आल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ आणि संतापाचे वातावरण पोलिसांनी पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. राजू जाधव असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

Pune Shirur crime
मुंबईत हाय अलर्ट! ३६ तासांत ८ मुलींसह १२ अल्पवयीन मुले बेपत्ता, तस्करीची भीती वाढली

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या पाबळ गावातील ३० वर्षांची भाग्यश्री राजू जाधव आणि तिचे दोन्ही लहान मुले विहिरीतून मृत अवस्थेत आढळले. प्रारंभिक माहिती नुसार, पतीकडून सतत होणाऱ्या मानसिक त्रास व तणावामुळे ती या गंभीर निर्णयाकडे वळाली असावी, अशी प्राथमिक शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. सकाळी महिला आपल्या दोन मुलांसह घरातून बाहेर गेली. अनेक तासांनी तिची आणि मुलांची पत्नी/आई परत न आल्याने तिच्या पतीने शोध सुरू केला. शोधकार्यादरम्यान, गावातील एका शेतकऱ्यांची विहीर तपासली असता मुलगी विहिरीत तरंगताना आढळली आणि लगेचच स्थानिक लोकांनी शोध सुरू ठेवला. त्यानंतर महिला व ५ वर्षांचा मुलगा सुद्धा विहिरीच्या आत मृत अवस्थेत सापडले.

Pune Shirur crime
TDP workers : मुख्यमंत्र्यांबद्दलचं ते विधान भोवलं, माजी मंत्र्यांच्या घरावर हल्ला, तोडफोडीनंतर जमावाने लावली आग
Pune Shirur crime
Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! १४ शहरात ४८ ब्लास्ट, १२० जणांचा मृत्यू, शेकडो गंभीर जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com