नाफेडने मांडला कांदा खरेदीचा खेळ; पहिल्याच दिवशी फज्जा, बळीराजाची थट्टा

onion farmer : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाफेडनं थेट बाजार समित्यांमधून कांदा खरदेची निर्णय पहिल्याच दिवशी फोल ठरल्याचं उघड झालंय. अधिकारी बाजार समितीकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे नाफेडने बळीराजाची कशी थट्टा केलीय. पाहूया एक रिपोर्ट....
onion farmers
onion farmer Saam tv
Published On

कांद्याला कवडीमोल भाव मिळत असताना दुसरीकडे नाफेडने कांदा खरेदीचा अक्षरश: खेळ मांडलाय. नाफेड आणि NCCF कडून सोमवारपासून बाजार समितीत कांदा खरेदी करण्यात येणार होती. त्यासाठी तांत्रिक अडचणीही जिल्हा प्रशासनाने दूर केल्या होत्या. मात्र पहिल्याच दिवशी खरेदीचं नियोजन फोल ठरलंय. नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह इतर कोणत्याही बाजार समितीत नाफेडचे अधिकारी कांदा खरेदीसाठी आले नसल्याची तक्रार आहे. बाजारात व्यापारी 1600 ते 2000 रुपयांनी कांदा खरेदी करत असताना नाफेड का उतरले नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. नाफेडच्या क्विंटलला 1580 रुपये दरावरुनही नाराजी आहे.

लासलगावनंतर चांदवडमध्येही नाफेडच्या कांदा खरेदीचं नियोजन पहिल्याच दिवशी फोल ठरलंय. कांदा व्यापाऱ्यांनी नियमित कांदा लिलाव सुरू केलाय. मात्र शासनाचा निर्णय असूनही नाफेडचे अधिकारी आले नसल्याने शेतकरी संतप्त झालेत.

onion farmers
अजब अटींमुळे नाफेडची कांदा खरेदी रखडणार? राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात

शासनाच्या सुचनेनुसार बाजार समितीमध्ये कांदा खरेदीसाठी कसे नियोजन करण्यात आले आहे ते पाहूया...

- नाफेड आणि NCCF कडून 8 जूनपासून नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदीचं नियोजन

- 30 जूनपर्यंत दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट

- कांदा खरेदी केंद्रांवर गैरप्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था

- देखरेखीसाठी तालुकास्तरावर स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती

- बाजार समित्यांमध्ये दर्शनी भागात कांद्याचा भाव आणि कांदा खरेदीबाबत मार्गदर्शक फलक लावण्याचे आदेश

- ग्रेडिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांना परत न पाठवण्याचे निर्देश

onion farmers
नाफेडची थेट बाजार समितीतून कांदा खरेदी, सहकारी संस्थांनाही व्यापारी परवाने मिळणार

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव पडल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलंय. त्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमीत शाहांची भेट घेतली होती. नाफेडला थेट बाजार समितीतून कांदा खरेदीचे निर्देश देऊनही उदासिन यंत्रणेमुळे पहिल्याचं दिवशी याचा फज्जा उडालाय. आता या खरेदीला कधी मुहूर्त मिळणार हे पाहयचं ?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com