सचिन बनसोडे, साम टीव्ही
नाशिकचा भोंदू अशोक खरात याचे प्रकरण राज्यभर गाजत असताना राजेंद्र गडगे, गणेश शिंदे पाठोपाठ आता अहिल्यानगर जिल्ह्यात आणखी एका भोंदूचा पर्दाफाश झाला आहे. श्रीरामपूर तालुक्यात पुन्हा एका भोंदू मांत्रिकाचा संतापजनक कारनामा समोर आला आहे. टाकळीभान येथे 'दावल मलिक बाबा'च्या नावाने दरबार भरवणाऱ्या अशोक आढाव या भोंदू मांत्रिकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
श्रीरामपूर तालुक्यातील भोंदू मांत्रिक अशोक आढाव याच्याकडे पोटाचे दुखणे बरे करण्यासाठी आलेल्या पीडित महिलेला भूतबाधा झाल्याचे सांगून मागील तीन वर्षात याने पीडित महिलेकडून सोन्याच्या ऐवजांसह तब्बल 16 लाख रुपये उकळले आहेत. मांत्रिक विधीच्या नावाखाली या भोंदूने पीडित महिलेकडे शरीरसुखाची मागणी करत तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद महिलेने दिलीय.
गेल्या तीन वर्षांत मांत्रिकाने विधी करण्याच्या बहाण्याने पीडित महिलेकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १६ लाख रुपयांचा गंडा घातला.पैशांची लूट करूनही या भोंदूचे मन भरले नाही. त्याने मांत्रिक विधीच्या नावाखाली महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
या जाचाला कंटाळून अखेर पीडित महिलेने श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि फिर्याद नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ चक्रे फिरवली आणि आरोपी अशोक आढाव याला अटक केली. आरोपी विरोधात जादूटोणा विरोधी कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अशा भोंदू बाबांच्या थापांना नागरिकांनी बळी पडू नये. असे आवाहन सामाजिक संघटनांकडून करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.