Ashok Kharat: कल्पना खरात कुठे आहे? भोंदू खरातने पोलिसांना दिली महत्वाची अपडेट

Nashik Bhondubaba Ashok Kharat: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अशोक खरातने बायको कल्पना खरातबाबत महत्वाची अपडेट दिली. पोलिस सध्या कल्पना खरातचा शोध घेत आहेत.
Ashok Kharat Case
Ashok Kharat CaseSaam Tv
Published On

Summary -

  • शिर्डी जमीन व्यवहार फसवणूक प्रकरणात कल्पना खरात अद्याप फरार

  • अशोक खरातने पोलिसांना पत्नीबाबत माहिती नसल्याचे सांगितले

  • या प्रकरणात एसआयटी आणि अहिल्यानगर पोलिस तपास करत आहेत.

  • अशोक खरात आणि साक्षीदारांची समोरासमोर चौकशी सुरू आहे.

सचिन बनसोडे, अहिल्यानगर

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात अशोक खरातच्या बायकोवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून कल्पना खरात फरार आहे. एक महिना उलटूनही पोलिसांना फरार कल्पना खरातचा शोध लागत नाही. अशामध्ये भोंदू खरातने पोलिस चौकशीदरम्यान पोलिसांना बायकोबद्दल महत्वाची माहिती सांगितली. मी १८ मार्चपासून पोलिसांच्या ताब्यात आहे. कल्पना खरात कुठे आहे ते मला माहीत नाही, असे खरात म्हणाला. सध्या शिर्डी जमीन व्यवहार फसवणूक प्रकरणात अशोक खरात आणि साक्षीदारांची समोरासमोर चौकशी सुरू आहे.

नाशिक टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला एक महिन्यानंतर पोलिसांकडून अटक करण्यात आली. नाशिक पोलिसांची विविध पथके तिचा शोध घेत होते. अखेर संभाजीनगरनगरमधून तिला ताब्यात घेण्यात आले. तर दुसरीकडे शिर्डीतील जमीन व्यवहारात फसवणूक आणि अवैध सावकारी प्रकरणातील आरोपी कल्पना खरात एक महिना उलटूनही पोलिसांना सापडत नाहीये. एसआयटीसह अहिल्यानगर पोलिसांची पथके तिचा शोध घेत आहेत. मात्र पोलिसांना कल्पना खरातचा शोध घेण्यात अद्याप यश आले नाही.

Ashok Kharat Case
Ashok Kharat: भोंदू अशोक खरातची प्रकृती बिघडली, SIT चौकशीदरम्यान छातीत दुखू लागलं; नंतर रुग्णवाहिका बोलावली

कल्पना खरात कुठे आहे याबाबत आपल्याला माहीत नसल्याचं अशोक खरातने शिर्डी पोलिसांच्या चौकशीदरम्यान सांगितले. शिर्डीतील जमीन व्यवहार प्रकरणात अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, खरातचे हस्तक अरविंद बावके, किरण सोनवणे आणि अशोक तांबे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. यातील बावके आणि सोनवणे हे दोन आरोपी आधीच गजाआड झाले आहेत. तर अशोक खरातला देखील शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Ashok Kharat Case
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, नाशिकमधील प्रसिद्ध डॉक्टरचं नाव समोर; गर्भपातासाठी करायचा मदत

आज अशोक खरात आणि जमीन व्यवहारातील साक्षीदारांची समोरासमोर बसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून काय खुलासे होतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. तर शिर्डी पोलिसांनी चौकशी दरम्यान अशोक खरातला कल्पना खरात कुठे आहे? असे विचारले असता आपण १८ मार्चपासून पोलिसांच्या ताब्यात आहे. आपल्याकडे मोबाईल नाही तसेच बाहेरची माहिती मिळायला कुठलाही सोर्स नाही. मला कल्पना खरात बाबत माहिती नसल्याचे त्याने चौकशीदरम्यान म्हटलं. त्यामुळे फरार कल्पना खरातचा शोध लागणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Ashok Kharat Case
Ashok Kharat Case: अशोक खरातचं आणखी एक नवं कांड, उरणमध्ये ४ कोटींची जमीन फक्त ५८ लाखांत खरेदी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com