Scam : राज्यपालांच्या PA च्या नावाने रेल्वेच्या VVIP तिकिटांचा घोटाळा! 'लोकभवन'च्या बनावट लेटरहेडचा वापर; ७ जणांना अटक

Railway VVIP quota rules : राज्यपालांच्या पीएच्या नावाने बनावट लेटरहेड, सही आणि शिक्क्यांचा वापर करून रेल्वेच्या VVIP तिकिटांचा कथित घोटाळा उघड. मुंबई पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह ७ जणांना अटक केली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
Fake Governor PA letter used for railway VVIP tickets
Fake Governor PA letter used for railway VVIP ticketsSaam TV
Published On

Fake Governor PA letter used for railway VVIP tickets : सण-उत्सवाच्या काळात लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकिटांसाठी प्रवाशांची मोठी गर्दी असते. याच गर्दीचा गैरफायदा घेत दलालांनी थेट राज्यपालांच्या पीएच्या (Personal Assistant) नावाने बनावट व्हीव्हीआयपी (VVIP) तिकिटांचे रॅकेट चालवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'लोकभवन'चे बनावट लेटरहेड तसेच राज्यपालांच्या पीएची बनावट सही आणि शिक्का वापरून रेल्वेची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील सुमारे ५०० हून अधिक दलालांच्या सिंडिकेटने VVIP इमर्जन्सी कोट्याच्या नावाने रेल्वेला कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. गेल्या ५ महिन्यांपासून या प्रकरणाचा तपास सुरू असून, याप्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अंबरीश ठक्कर याच्यासह ७ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Fake Governor PA letter used for railway VVIP tickets
"चंद्रकांत पाटलांना नोबेल पुरस्कार द्या"; चंद्रकांत पाटलांच्या फिंगरप्रिंट विधानावर संजय राऊतांचा खोचक टोला

अशी होती 'मोडस ऑपेरंडी' (Modus Operandi)

राज्यातील अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या लोकभवनच्या नावाने बनावट लेटरहेड बनवून रेल्वेच्या डोळ्यात धूळ फेकणारा अंबरीश ठक्कर अत्यंत हुशारीने हे जाळे चालवत होता. अंबरीशचे एजंट लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेटिंग लिस्ट मधील प्रवाशांना गाठून त्यांचे PNR नंबर मिळवायचे आणि ते अंबरीशकडे पाठवायचे. अंबरीश उच्चपदस्थांच्या नावाने बनावट सही आणि शिक्क्यांचे लेटरहेड तयार करून VVIP इमर्जन्सी कोट्यातून तिकिटे कन्फर्म करून घ्यायचा.या काळ्या धंद्यातून आलेला पैसा तपास यंत्रणांच्या नजरेत येऊ नये, म्हणून तो ही रक्कम पत्नीच्या आणि आपल्या कापड दुकानातील कामगारांच्या बँक खात्यांवर वळवायचा.

Fake Governor PA letter used for railway VVIP tickets
Housing Society Rules : फ्लॅट रेंटवर दिला, पण 'हे' काम केलेच नाही? थेट गुन्हा दाखल होऊ शकतो; जाणून घ्या काय आहेत नियम

हे सिंडिकेट केवळ लोकभवनपुरते मर्यादित नव्हते. अंबरीश ठक्करने रेल्वेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या नावानेही बनावट लेटरहेड बनवून तिकिटांचा काळाबाजार केल्याची माहिती समोर आली आहे.विशेष म्हणजे, अंबरीश ठक्कर हा यापूर्वीही अशा गुन्ह्यांत सहभागी होता. एप्रिल २०२५ मध्ये पश्चिम रेल्वे आणि कुर्ला येथे तिकिटांचा काळाबाजार करताना रेल्वे पोलिसांनी त्याला पकडले होते. मात्र, दोन्ही प्रकरणांत तो अटकपूर्व जामीन मिळवून बाहेर आला होता. यावेळेस मात्र थेट राज्यपालांच्या कार्यालयाच्या (लोकभवन) नावाने बनावट शिक्के आणि सह्या करण्यापर्यंत त्याची मजल गेली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

राज्यपालांच्या कार्यालयाचा वापर करून कोट्यवधींचे रॅकेट चालवणाऱ्या या प्रकरणात पोलीस आता संपूर्ण पाळेमुळे खणून काढणार का? तसेच यात अंबरीश ठक्कर हाच मुख्य सूत्रधार आहे की यामागे आणखी मोठे मासे दडले आहेत, याचा शोध घेणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com