Nanded News : दहा कोटींच्या निधीचे काय?चांगला रस्ता व्हावा यासाठी माजी सैनिकांना बसावे लागले खड्ड्यात

दहा कोटींचा निधी आलेला असताना देखील चार महिन्यांपासून काम चालू होतं नसल्याने हे आंदाेलन केल्याचे माजी सैनिकांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.
Nanded News, Potholes, Road, Andolan
Nanded News, Potholes, Road, Andolansaam tv
Published On: 

- संजय सूर्यवंशी

Nanded News : शहरात उत्तम रस्ता मिळावा यासाठी माजी सैनिक एकटवले आणि त्यांनी आज (गुरुवार) चक्क रस्त्यावरील खड्ड्यात बसून आंदाेलन केले. या आंदाेलनाची दिवसभर नांदेड जिल्ह्यातील कंधार शहरात चर्चा सुरु हाेती.

Nanded News, Potholes, Road, Andolan
Rain Hits Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात भिंत कोसळून महिलेचा मृत्यू, दाेघे गंभीर; तहसीलदार घटनास्थळी

नांदेड जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्र असलेलं ऐतिहासिक कंधार शहरातील महाराणा प्रताप चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा मुख्य रस्ता राजकीय द्वेषामुळे गेल्या दहा वर्षांपासून होत नाही असा आराेप सातत्याने केला जाताे. हा रस्ता व्हावा यासाठी आज माजी सैनिकांनी पुढाकार घेतला.

Nanded News, Potholes, Road, Andolan
Parbhani DCC Bank : 2 कोटींचा अपहार; परभणी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे 73 कर्मचारी धास्तावले?

कंधार शहर व तालुक्यातील माजी सैनिकांनी आज रस्त्यावरच्या खड्यात बसून आमदार, खासदार याबराेबरच कंधार नगरपरिषदेचा निषेध केला. 28 जुलै पर्यंत काम चालू न केल्यास माजी सैनिक संघटना रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी माजी सैनिकांनी दिला आहे.

Nanded News, Potholes, Road, Andolan
Bullock Cart Race Lovers : लाखमाेलाच्या 'लक्ष्या' ला गावक-यांचा भावपूर्ण निराेप, आरोटे कुटुंबियांना अश्रू अनावर

दरम्यान दोन वेळा या रस्त्यासाठी (road) आलेला निधी परत गेला. सध्या या कामासाठी दहा कोटी रुपयांचा निधी आलेला असताना देखील चार महिन्यांपासून काम चालू होतं नसल्याने हे आंदाेलन केल्याचे माजी सैनिकांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com