Parbhani DCC Bank : 2 कोटींचा अपहार; परभणी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे 73 कर्मचारी धास्तावले?

या अनुषंगाने विविध बाबींखाली लेखापरीक्षणात ठपका ठेवण्यात आला आहे.
parbhani dcc  bank
parbhani dcc banksaam tv
Published On

Parbhani News : परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (parbhani dcc bank news) तत्कालीन अधिकारी, कर्मचारी, तालुका तपासणी व अंतर्गत तपासणीसांच्या हलगर्जीपणामुळे 1 कोटी 96 लाख 90 हजार 414 रुपयांचा अपहार प्रकरणी ऑडीटमध्ये ताशेरे ओढण्यात आले आहेत. आता या प्रकरणात संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना जबाबदार का धरण्यात येऊ नये अशा आशयाची 73 कर्मचाऱ्यांना बँकेने नुकतीच नोटीस बजावली आहे. (Maharashtra News)

parbhani dcc  bank
Maratha Samaj Morcha : 15 गावांत कडकडीत बंद... शेकडाे कार्यकर्त्यांसह मराठा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन 2020 - 21 या वर्षातील विशेष लेखापरीक्षण अहवाल विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांच्या आदेशानुसार लेखा परीक्षकांनी लेखापरीक्षण करून सादर केला.

parbhani dcc  bank
Nandurbar Condemns Manipur Incident : शहादात समाजकंटकांची बसवर दगडफेक, नंदुरबार जिल्ह्यात आज कडकडीत बंद

या अहवालात या आर्थिक वर्षात झालेल्या नियमबाह्य कामकाज करून जवळपास 2 कोटींच्या अपहाराच्या रकमेची वैज्ञानिक चौकशी करण्यासाठी विभागीय सहनिबंधकांनी (26 ऑगस्ट 2022) दिलेल्या आदेशानुसार येथील तत्कालीन सहायक निबंधक नानासाहेब कदम यांची नियुक्ती केली होती.

parbhani dcc  bank
Uddhav Thackeray Faction Vs Bjp : उद्धव ठाकरे गटातील महिलांच्या रुद्रावतारापुढे भाजप नेता नरमला, दिले 'हे' आश्वासन

नानासाहेब कदम यांची मंत्रालयात प्रतिनियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या जागी सहायक निबंधक माधव कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अनुषंगाने विविध बाबींखाली लेखापरीक्षणात ठपका ठेवण्यात आला आहे.

त्यामुळे बँकेच्या (dcc bank) या आर्थिक नुकसानीची जबाबदारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निश्चित करण्याचे काम प्राधिकृत अधिकारी यादव यांनी केली. या कारणास्तव दोषी व्यक्तींवर आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी तत्कालीन 73 कर्मचा-यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com