ED चे पथक सांगलीत, बड्या व्यावासियाकाच्या बंगल्याबाहेर CRPF चे जवान तैनात

Enforcement Directorate Officers In Sangli : सध्या बंगल्यात अधिकारी चाैकशी करीत आहेत.
Sangli, Enforcement Directorate Officers In Sangli
Sangli, Enforcement Directorate Officers In Sanglisaam tv

Sangli News : सांगली शहरात आज (शुक्रवार) सकाळी ईडीचे (Enforcement Directorate) दोन पथकं दाखल झाली आहेत. ही पथकं शिवाजीनगर मधील पारेख बंधू यांच्या दोन बंगल्यात गेली आहेत. तेथे ईडीचे अधिकारी काही जणांची चौकशी करत आहेत. सध्या काेणत्याही तपशिल माध्यमांना देण्यास अधिका-यांनी नकार दिला आहे. (Maharashtra News)

Sangli, Enforcement Directorate Officers In Sangli
Nashik Crime News : रेल्वे स्टेशनवर त्याची पडली तिच्यावर वाईट नजर, मित्राला बाेलावून केला विवाहितेवर सामूहिक अत्याचार; दाेघे अटकेत

पारेख हे सांगलीतील (sangli) बडे व्यावसायिक आहेत. त्यांचा शिवाजीनगर परिसरात बंगला आहे. या बंगल्यात आज ईडीचे (ED) पथक पहाटेच्या सुमारास चाैकशीसाठी आले. या बंगल्याबाहेर सीआरएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

Sangli, Enforcement Directorate Officers In Sangli
Satara Lok Sabha Constituency: उदयनराजे आहेतच, तरीही... सातारा लाेकसभा मतदारसंघात भाजप शाेधताेय उमेदवार?

ईडीचे अधिकारी सांगलीत आलेत ही बातमी शहरात वाऱ्या सारखी पसरली. शिवाजीनगर मधील पारेख बंधूच्या दोन बंगल्यामध्ये ईडीचे अधिकारी चौकशी करत असल्याने शहरात सध्या तर्क वितर्क सुरु आहेत. सध्या तरी या चाैकशीबाबत काेणताही तपशिल अधिका-यांनी उघड केलेला नाही.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com