Nashik Crime News : रेल्वे स्टेशनवर त्याची पडली तिच्यावर वाईट नजर, मित्राला बाेलावून केला विवाहितेवर सामूहिक अत्याचार; दाेघे अटकेत

या घटनेमुळे नाशिक शहर परिसरात खळबळ माजली.
Nashik Crime News
Nashik Crime Newssaam tv

Nashik News : नवसारीहून बहिणीकडे आलेल्या एका विवाहितेवर चेहडी परिसरात सामूहिक अत्याचार करण्यात आला. या घटनेतील दोन संशयितांना पाेलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांपैकी एक रेल्वे स्थानकावर पाणी विक्री करताे तर दुसरा रिक्षाचालक आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

Nashik Crime News
Bombay High Court Order : धाराशिव नव्हे उस्मानाबाद, जाणून घ्या मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १९ वर्षीय विवाहिता तिच्या बहिणीला भेटण्यासाठी रेल्वेने नवसारीहून मुंबईमार्गे नाशिकला आली. बुधवारी मध्यरात्रीनंतर पहाटे अडीचच्या सुमारास ती नाशिकरोड रेल्वे स्थानकावर उतरली. त्यानंतर सहप्रवाशाच्या मोबाईलवरून तिने बहिणीला फोन केला. पण उशीर झाला असल्याने आता येण्याची घाई करू नका, रेल्वे स्टेशनवरच थांबा असे बहिणीने तिला सांगितले.

Nashik Crime News
Satara News : मुख्यमंत्री साता-यात, जिल्हाधिका-यांसह एसपींकडून घेतली महत्त्वपूर्ण माहिती; दिले हे निर्देश

मी सकाळी तुला घ्यायला येईन असे बहिणीने सांगितल्याने पीडितेने रेल्वे स्थानकावर थांबण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, रेल्वे स्थानकावर पाणी विकणाऱ्या कुणाल पवार याने तिला मदत करण्याच्या बहाण्याने विचारणा केली. तसेच काही खायला दिले. काही वेळाने त्याने प्रकाश मुंडे या रिक्षाचालक मित्रालाही बोलावून घेतले.

Nashik Crime News
Udayanraje vs Shivendraraje : साताऱ्यात राडा, भूमिपूजनापूर्वी ग्रामस्थांनी साहित्य फेकून दिलं; उदयनराजे - शिवेंद्रराजेंत जुंपणार?

पीडितेची दिशाभूल करून दोघांनी तिला चेहाडी येथील शिव परिसरात नेले. तेथे पेरूच्या बागेत नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने पीडितेला बेदम मारहाण केली आणि कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, पीडितेने आरडाओरडा करून तेथून पळ काढला. त्यावेळी शेजारील इमारतीतील सुरक्षा रक्षकाच्या मदतीने तिने पोलिसांपर्यंत (police) घटनेची माहिती पाेहचवली.

Nashik Crime News
International Yoga Day : रामदेव बाबांना पण जमणार नाय... खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या याेगावर नेटिझन्सची झडतीय चर्चा (पाहा व्हिडिओ)

पाेलिसांनी पीडितेच्या तक्रारीनंतर कुणाल पवार आणि प्रकाश मुंडे यांची चाैकशी करत त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. या घटनेमुळे नाशिक शहर परिसरात खळबळ माजली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com