Satara News : मुख्यमंत्री साता-यात, जिल्हाधिका-यांसह एसपींकडून घेतली महत्त्वपूर्ण माहिती; दिले हे निर्देश

एका बैठकीत विविध विभागांच्या अधिका-यांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली.
CM Eknath Shinde, Satara
CM Eknath Shinde, SataraSaam Tv
Published On

Satara News : सद्य परिस्थितीत पाऊस लांबलेला असल्याने कोयना जलाशयातील कमी झालेला जलसाठा. त्यामुळे जलाशयातील साठलेला गाळ उचलण्याची निर्माण झालेली संधी या अनुषंगाने तात्काळ गाळ मुक्त धरण योजनेंतर्गत गाळ उचलण्यात यावा अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी सातारा जिल्हा प्रशासनास दिल्या. हा गाळ काढल्याने कोयना जलाशयाच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होईल. याचबरोबर महाबळेश्वर येथील सोळशी धरणाचा सर्वेक्षण आराखडा जलदगतीने पूर्ण करावा असे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. (Maharashtra News)

CM Eknath Shinde, Satara
Satara Lok Sabha Constituency: उदयनराजे आहेतच, तरीही... सातारा लाेकसभा मतदारसंघात भाजप शाेधताेय उमेदवार?

महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथील निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आले आहेत. यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्यातील विविध विकासकामांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध विभागातील अधिका-यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

CM Eknath Shinde, Satara
Ashadhi Wari : माऊली...माऊली...विठुरायाच्या पंढरीत भक्तीमयाचा सागर, 70 हजार भाविक दर्शन रांगेत उभे

कांदाटी खोऱ्यातील युवक रोजगारासाठी मुंबई, ठाणे व पुणे सारख्या शहराकडे जात आहेत. त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी व गेलेल्या तरुणांना पुन्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कांदाटी खोऱ्यातील पर्यटन विकास कामांबरोबर येथील शेतकऱ्यांना वनौषधी, बांबू लागवड करण्यावर प्रोत्साहित करुन नवीन उत्पन्नाचे साधन तयार करण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

CM Eknath Shinde, Satara
Satara News : शिवेंद्रराजेंसह 81 जणांवर गुन्हा दाखल; दाेन्ही राजे फडणवीसांच्या भेटीला (पाहा व्हिडिओ)

सर्व धरणांतील पाणी साठ्याची माहिती घेऊन मुख्यमंत्री श्री. शिदे म्हणाले, सद्य परिस्थितीत पाऊस लांबलेला असल्याने कोयना जलाशयातील कमी झालेला जलसाठा व त्यामुळे जलाशयातील साठलेला गाळ उचलण्याची निर्माण झालेली संधी या अनुषंगाने तात्काळ गाळ मुक्त धरण योजनेंतर्गत गाळ उचलण्यात यावा यामुळे कोयना जलाशयाच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होईल. याचबरोबर महाबळेश्वर येथील सोळशी धरणाचा सर्वेक्षण आराखडा जलदगतीने पूर्ण करावा अशी सूचना केल्या.

CM Eknath Shinde, Satara
Udayanraje vs Shivendraraje : साता-यात राडा; शिवेंद्रराजेंनतर तेथेच उदयनराजेंनी मारली कुदळ, म्हणाले...

जिल्ह्यातील जास्त पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी बांबू लागवड करून शेतकऱ्यांना त्याद्वारे अधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महाबळेश्वर पाचगणी पर्यटन विकास आराखडा, प्रदूषण नियंत्रण, घाट विकास आराखडा, स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती, तापोळा विकास आराखडा, महाबळेश्वर येथील पार्किंग, कांदाटी खोरे विकास, प्रतापगड विकास योजना, बेल एअर रुग्णालयाच्या कामांसह विविध विषयांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.

CM Eknath Shinde, Satara
Udayanraje vs Shivendraraje : साता-यात राडा: उदयनराजेंच्या समाेर शिवेंद्रराजेंनी फाेडला नारळ, जे करायचे ते...

जिल्हाधिकारी डूडी यांनी आदर्श शाळा व स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र ही नाविन्यपूर्ण संकल्पना जिल्ह्यात राबविण्यात येत असून शेतकऱ्यांचे आर्थिक उपन्नत वाढावे यासाठी जिल्ह्यात कृषी पर्यटनावर भर देण्यात येत असल्याचेही बैठकीत सांगितले.

जिल्हा परिषदेकडील असलेल्या विविध लोककल्याणकारी योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी खिलारी यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक शेख यांनी तापोळा येथील पोलीस चौकी सुधारणेचे काम लवकरात लवकर सुरु करणार असल्याचे सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com