Udayanraje vs Shivendraraje : साता-यात राडा: उदयनराजेंच्या समाेर शिवेंद्रराजेंनी फाेडला नारळ, जे करायचे ते...

आज सकाळपासून खिंडवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते.
Udayanraje vs Shivendraraje, Satara, Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale, satara krushi utpanna bazar samiti building bhoomipujan
Udayanraje vs Shivendraraje, Satara, Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale, satara krushi utpanna bazar samiti building bhoomipujansaam tv

Shivendraraje Bhosale News : खासदार उदयनराजे भाेसले यांनी न्यायालयाचा अवमान केला जाऊ नये अशी भूमिका पाेलिसांसमाेर मांडत सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजनाच्या (satara krushi utpanna bazar samiti building bhoomipujan) कार्यक्रम थांबवावा असे म्हटलं हाेते. दरम्यान उदयनराजे आणि पाेलिसांच्या उपस्थित कार्यक्रमस्थळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी नारळ फाेडत नूतन इमारतीच्या भूमिपूजनाचा साेहळा पार पाडला. यावेळी शिवेंद्रराजेंनी जे कायदेशिर असेल ते करावं असे पाेलिसांना म्हटलं. (Maharashtra News)

Udayanraje vs Shivendraraje, Satara, Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale, satara krushi utpanna bazar samiti building bhoomipujan
Pandharpur News : भाविकांनाे ! आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाई मंदिरात 'ही' दर्शन सेवा राहणार बंद

सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनापुर्वी आज (बुधवार) काही ग्रामस्थांनी कार्यक्रमाच्या घटनास्थळी पाेहचून तेथील साहित्य फेकून दिले. तसेच एक कंटेनर देखील उलटा करुन टाकला. या घटनेच्या वेळीस खासदार उदयनराजे भाेसले हे देखील घटनास्थळी पाेहचले. त्यानंतर घटनास्थळी शिवेंद्रसिंहराजे पाेहचले. त्यावेळी आमदारांच्या कार्यकर्त्यांनी घाेषणाबाजी केली. दाेन्ही राजांच्या (उदयनराजे Udayanraje Bhosale आणि शिवेंद्रराजे Shivendraraje Bhosale) कार्यकर्त्यांत धक्काबुक्की देखील झाली.

Udayanraje vs Shivendraraje, Satara, Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale, satara krushi utpanna bazar samiti building bhoomipujan
Vasota Fort News : दूर्गप्रेमींनाे ! वासोटा किल्ला आजपासून पर्यटनासाठी बंद; जाणून घ्या कारण

यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी पाेलिसांशी चर्चा करताना मार्केट कमिटीच्या नावावर जागा आहे. आम्हांला काेणाशी वाद घालायचा नाही. मार्केट कमिटीच्या नावाने न्यायालयात निकाल लागले आहेत. आम्ही कायदेशिर कार्यक्रम करत आहाेत. आम्ही जर चुकलाे असेल तर आमच्यावर (मार्केट कमिटीच्या सदस्यांसह) गुन्हा दाखल करा असेही शिवेंद्रसिंहराजेंनी पाेलिसांना सांगितलं.

Udayanraje vs Shivendraraje, Satara, Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale, satara krushi utpanna bazar samiti building bhoomipujan
Jawan Suraj Yadav News : जवान सूरज यादव यांचं निधन, येरवळे गावावर शाेककळा

शिवेंद्रराजेंनी फाेडला नारळ

यावेळी खासदार उदयनराजे भाेसले यांनी माझ्या प्राॅपर्टीबाबत यापु्र्वी मार्केट कमिटीने पाेलिसांपुढे काेणतेच उत्तर दिले नाही. काेणतीही चर्चा केली नाही. त्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी जागेचा सात बारा आमच्या नावावर (मार्केट कमिटीच्या सदस्यांसह) आहे असे म्हणत नारळ फाेडला.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com