Jawan Suraj Yadav News : जवान सूरज यादव यांचं निधन, येरवळे गावावर शाेककळा

दूरध्वनीवरून रात्री अकराच्या सुमारास गावाकडे ही माहिती मिळाली.
Jawan Suraj Yadav, Satara, Karad, Indian Army
Jawan Suraj Yadav, Satara, Karad, Indian Armysaam tv

Jawan Suraj Yadav News : आसाम येथील दिमापूरमध्ये सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील येरवळे गावचे सुपुत्र जवान सूरज मधुकर यादव (Jawan Suraj Yadav) यांचे निधन झालं. ते भारतीय लष्कराच्या सेवेत होते. त्यांच्या निधनाने येरवळे (yervale) गावावर शोककळा पसरली आहे. आज (बुधवार) त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. (Maharashtra News)

Jawan Suraj Yadav, Satara, Karad, Indian Army
Satara News : सातारकरांसाठी गुड न्यूज, आजपासून पाणी कपात रद्द; 'हे' चार दिवस कास, शहापूरच्या पुरवठ्यावर परिणाम

सोमवारी सायंकाळी घडलेल्या घटनेची माहिती रात्री उशिरा गावाकडे समजताच गावातील वातावरण सुन्न झाले आहे. ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचे पार्थिव विमानाने आज (बुधवारी) पुण्यात त्यानंतर (Satara) गावाकडे आणले जाणार आहे.

Jawan Suraj Yadav, Satara, Karad, Indian Army
Pandharpur News : पंढरपूरात 115 इमारती धोकादायक; पडक्या मठ, धर्मशाळांत भाविकांनी राहू नये : पालिकेचे आवाहन

सूरज यादव २००७-०८ दरम्यान भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. काही वर्षे त्‍यांनी पुण्यात सेवा बजावली. तद्नंतर तीन महिने बरेली (उत्तर प्रदेश) येथून पुढे नागालँड (आसाम) याठिकाणी १११ इंजिनिअर रेंजमेंट विभागात ते कार्यरत होते.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com