Ashadhi Wari : माऊली...माऊली...विठुरायाच्या पंढरीत भक्तीमयाचा सागर, 70 हजार भाविक दर्शन रांगेत उभे

यंदा पंढरपूरात आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल रखूमाई मंदिरात व्हीआयपी दर्शन सेवा बंद राहणार आहे.
pandharpur, ashadhi wari 2023, Pandharpur Wari 2023, Pandharpur Yatra, Ashadi Ekadashi
pandharpur, ashadhi wari 2023, Pandharpur Wari 2023, Pandharpur Yatra, Ashadi Ekadashisaam tv
Published On

Pandharpur News : आषाढी यात्रेच्या (Ashadhi Ekadashi) सोहळ्याला दहा दिवसांचा अवधी असला तरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरात आत्तापासूनच हजाराे भावक दाखल हाेऊ लागले आहेत. आज (मंगळवार) श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. (Maharashtra News)

pandharpur, ashadhi wari 2023, Pandharpur Wari 2023, Pandharpur Yatra, Ashadi Ekadashi
New Babies Born : तिळ्यांच्या जन्माने जाधव कुटुंबियांत हर्षाेल्लास; आईसह तान्हुले ठणठणीत

आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2023) निमित्त पंढपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आजपासून (मंगळवार) विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शन सुरू राहणार आहे. आज सकाळी ११ वाजता विधिवत पूजा करून देवाचा पलंग काढला जाणार आहे. प्रत्येक मिनिटाला ३५ ते ४० भाविकांना विठुरायाचे प्रत्यक्ष दर्शन घेता येईल अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली.

pandharpur, ashadhi wari 2023, Pandharpur Wari 2023, Pandharpur Yatra, Ashadi Ekadashi
Success Story : कष्टकरी कुटुंबातील युक्ताला Youtube ची मिळाली साथ, Neet परीक्षेत मिळविले उज्जवल यश

आज (shri vitthal rukmini mandir) विठुरायाची पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपूर रोडवरील पत्राशेड पर्यंत गेली आहे. येथील चार पत्राशेड भाविकांनी भरले आहेत. सध्या दर्शन रांगेत जवळपास 60 ते 70 हजार भाविक उभे आहेत. सध्या दर्शनाचा प्रति मिनीट वेग 40 भाविक इतका आहे. दर्शनासाठी भाविकांना सुमारे सहा ते सात तासांचा वेळ लागत आहे. या दर्शन रांगेतील भाविकांसाठी मंदिर समितीने पाणी, चहा, नाष्टा आदींची सोय केली आहे. स्वच्छतेसाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

pandharpur, ashadhi wari 2023, Pandharpur Wari 2023, Pandharpur Yatra, Ashadi Ekadashi
Rasta Roko At Solapur Tuljapur Highway : रयत क्रांती संघटनेने राेखला सोलापूर - तुळजापूर महामार्ग, वाहतुक ठप्प (पाहा व्हिडिओ)

आषाढी एकादशी कधीपासून प्रारंभ?

आषाढी एकादशीचा प्रारंभ २९ जून २०२३ पहाटे ३ वाजून १८ मिनिटांनी ते समाप्तीः ३० जून २०२३ रोजी पहाटे २ वाजून ४२ मिनिटे भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे आषाढी एकादशी गुरुवार २९ जून २०२३ रोजी साजरी करण्यात येईल.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com