El Nino : अल-निनोमुळे भारतासाठी धोक्याची घंटा! २०२७ मध्ये उष्णतेचा रेकॉर्ड मोडणार, WHO कडून ग्रेड-3 अलर्ट जारी

El Nino Alert Weather Update News : २०२६ नंतर आता २०२७ मध्ये अल-नीनोचा भारतावर परिणाम होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला असून यामुळे आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता WHO ने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर WHO ने ग्रेड-3 अलर्ट दिला आहे.
El nino impact india
El nino impact india AI Image
Published On: 

जगभरात अल-नीनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम केवळ हवामानावरच नाही तर लोकांच्या आरोग्यावरही होऊ शकतो. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गंभीर चिंता व्यक्त केली आहे. ऑक्टोबर २०२६ ते सप्टेंबर २०२७ या काळात निर्माण होणाऱ्या संभाव्य आरोग्य धोक्यांच्या पार्श्वभूमीवर WHO ने जागतिक स्तरावर ग्रेड-3 लागू केला आहे. हा संघटनेचा सर्वाधिक गंभीर अलर्ट मानला जातो.

WHO च्या अहवालानुसार, भारतासह दक्षिण आशियातील अनेक देशांना अल-नीनोचा फटका बसू शकतो. भारतात यंदा तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची आणि पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा, पाणीटंचाई आणि विविध आजारांच्या समस्या वाढू शकतात.

El nino impact india
Blood Sugar:  शुगर कंट्रोल करण्याचा सर्वात सोपा उपाय! रात्री खोलीत 'ही' एक गोष्ट , रक्तातील साखर राहील एकदम नॉर्मल

डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढण्याची शक्यता

अल-नीनोमुळे ऋतुचक्रामध्ये बदल होऊ शकतो. याचा परिणाम डासांच्या वाढीवर होऊन डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा प्रसार वाढण्याची भीती आहे. तसेच दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार आणि इतर संसर्गजन्य आजारही वाढू शकतात.दुसरीकडे, वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना डिहायड्रेशन, चक्कर येणे आणि उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि आधीपासून आजारी असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

El nino impact india
Bribe Case : बड्या अधिकाऱ्याने स्वीकारली लाच, असा अडकला ACB च्या जाळ्यात; नागपूरमध्ये खळबळ

शेती आणि पाणीपुरवठ्यावरही परिणाम

अल-नीनोचा परिणाम मान्सूनवर होण्याची शक्यता आहे. पाऊस कमी झाल्यास शेतीचे नुकसान होऊ शकते. यामुळे अन्नधान्य उत्पादन घटण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची टंचाईही निर्माण होऊ शकते. शेतकरी आणि मजुरांच्या उत्पन्नावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

El nino impact india
Transfer : पोलीस दलात मोठे फेरबदल! ३ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुठे केली नियुक्ती ? जाणून घ्या

WHO ने दिल्या महत्त्वाच्या सूचना

संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी WHO ने आरोग्य यंत्रणांना आधीपासून तयारी करण्याचे आवाहन केले आहे. डेंग्यू-मलेरियावर नियंत्रण, रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि नागरिकांमध्ये जनजागृती यावर भर देण्यात आला आहे. मात्र, अल-नीनोमुळे भारतात प्रत्येक ठिकाणी दुष्काळ किंवा आरोग्य संकट निर्माण होईलच असे नाही. त्याचा परिणाम हवामानातील बदल आणि स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असेल. त्यामुळे वेळीच खबरदारी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.