पुणे शहर पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
बंडगार्डन पोलीस ठाण्याचे संतोष पांढरे यांची वाहतूक शाखेत बदली; त्यांच्या जागी शशिकांत चव्हाण यांची नियुक्ती.
लष्कर पोलीस ठाण्याचे युवराज हांडे यांची विशेष शाखेत बदली; मारुती खेडकर यांच्याकडे नवीन जबाबदारी.
सागर आव्हाड, पुणे
पुणे शहर पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमुळे काही पोलीस ठाण्यांच्या प्रमुखपदांमध्येही बदल झाले आहेत.
बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी शशिकांत चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मारुती खेडकर यांच्याकडे लष्कर पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांची खडक पोलीस ठाण्यात गुन्हे पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी समाधान पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे पुणे शहर पोलीस दलातील महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली असून, संबंधित अधिकाऱ्यांकडून आता नव्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या जाणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.