Maharashtra Politics : बैठकीत टशनबाजी! शिंदे-ठाकरे आमने-सामने, एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरेंनी एकमेंकांना दिली खुन्नस

Maharashtra Political News : शिवसेनेच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने-सामने आले... मात्र यावेळी नेमकं काय घडलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsX (Twitter)
Published On

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये फुट पडली. त्यानंतर शिंदे आणि ठाकरे यांच्यात वाद पेटला. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे पहिल्यांदाच समोरासमोर आले... पण या भेटीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या या विशेष रिपोर्टमध्ये...

- दोघं समोरासमोर आले आणि सुरु झाली टशन...

- मुंबईतल्या रस्त्यांबाबत आमदारांची ही बैठक

- एक उपमुख्यमंत्री आणि एक आमदार मध्ये दोन खुर्च्यांच अंतर...मात्र त्यांच्या देहबोलीत भरलीये टशन....

एवढंच नाही तर बैठकीत एकनाथ शिंदे बोलत असताना आदित्य ठाकरे शिंदेंकडे एकटक बघतच राहिले.. मात्र शिंदेंनी आदित्य ठाकरेंशी नजर भिडवणं टाळलंय.. आतापर्यंत एकमेकांसमोर न येता टीका करणारे ठाकरे आणि शिंदे आता समोरासमोर भिडत असल्याचं चित्र आहे..

Maharashtra Politics
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांचं बुलडोझर सरकार! युपीचा बुलडोझर पॅटर्न महाराष्ट्रात, दंगलखोरांच्या घरांवर जेसीबीची कारवाई

खरंतर याआधीही विधीमंडळात मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली होती. दरम्यान फडणवीसांच्या शेजारी असतानाही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकमेकांकडे पाहणं टाळलं होतं.. मात्र आता समोरासमोर आल्यानंतर आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंकडे एकटक पाहिलं असलं तरी शिंदेंनी मात्र नजरानजर टाळलीय.. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे-शिंदे वादाचा नवा अंक सुरु होणार हे आता स्पष्ट झालंय....

Maharashtra Politics
Waghya Dog Controversy : रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? औरंगजेबाच्या कबरीनंतर वाघ्याची समाधी वादात, नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com