Waghya Dog Controversy : रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? औरंगजेबाच्या कबरीनंतर वाघ्याची समाधी वादात, नेमकं प्रकरण काय?

Waghya Dog : औरंगजेबाच्या कबरीनंतर आता वाघ्या कुत्र्याची समाधीचा वाद ऐरणीवर आलाय. मात्र हा वाद नेमका काय आहे? संभाजीराजे छत्रपतींनी नेमकी काय मागणी केलीय? आणि वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक संदर्भ काय आहेत?
Waghya Dog Controversy
Waghya Dog ControversyX (Twitter)
Published On

एकीकडे राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरुन वाद सुरु असतानाच संभाजीराजे छत्रपतींनी मोठी मागणी केलीये. कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि महत्त्व नसलेली वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावरुन हटवण्यात यावी, अशी मागणी संभाजीराजे छत्रपतींनी केलीये.. यासंबंधी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहलंय. 31 मेपर्यंत हा पुतळा हटवण्यात यावा अशी मागणी केलीये. त्यामुळे पुन्हा ऐतिहासिक विषयावरुन वाद उफाळलायं. वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा काय इतिहास आहे पाहूया..

वाघ्याची समाधी वादात

- 'वाघ्या' हा छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावान कुत्रा,अशी आख्यायिका

- 1680 छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन, वाघ्याचं चितेत उडी देऊन बलिदान अशी वदंता

- समाधीची प्रत्यक्ष उभारणी 20व्या शतकात,समाधीला इंदूरच्या प्रिन्स तुकोजी होळकरांकडून निधी

- स्मारक ऐतिहासिक नव्हे, तर लोकश्रद्धेचे प्रतीक

- यापूर्वीही, 2011 मध्ये संभाजी ब्रिगेडकडून वाघ्याच्या पुतळ्यावर हल्ला

- भारतीय पुरातत्व विभागाकडे वाघ्याबाबत कोणतीही पुरावे नाहीत

छत्रपती संभाजीराजेंच्या मागणीला इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटेंनी दुजोरा दिलाय... वाघ्या कुत्र्यासंदर्भात इतिहासात कोणताही ठोस पुरावा नाही.. राम गणेश गडकरींच्या डोक्यातून ही कल्पना आली असा दावा श्रीमंत कोकाटेंनी केलाय... तर औरंगजेब आणि वाघ्या कुत्र्याचा विषय हा जुना झालाय...जुने विषय आता बाहेर का काढता असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केलाय....

Waghya Dog Controversy
High Court News : पत्नीचा अश्लील व्हिडीओ बनवला, फेसबुकवर टाकला; पतीच्या घाणेरड्या कृत्यावर हायकोर्टचा संताप

रायगडावर गेली अनेक वर्ष उभी असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी केवळ एक पुतळा नाही, तर त्यामागे निष्ठेची भावना आणि ऐतिहासिक वादाचे बरेच गुंते आहेत. मात्र इतिहासातील जुने वाद उकरण्यात काय हशिल ? जनतेच्या मुलभूत गरजा,ग्रामीण भागातील प्रश्न अजुनही कायम आहेत. त्यावर चर्चा होणं अपेक्षित असताना गेल्या काही दिवसांपासून राज्यात गाजताहेत ते घडून गेलेले ऐतिहासिक मुद्दे आणि त्यावरचे निरर्थक वाद..

Waghya Dog Controversy
Meerut Murder Case : हत्येपूर्वी बाईकवर दिसला होता सौरभ, मुस्कानसाठी घेतलं पार्सल; शेवटच्या क्षणी काय घडलं? CCTV फुटेज समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com