High Court News : पत्नीचा अश्लील व्हिडीओ बनवला, फेसबुकवर टाकला; पतीच्या घाणेरड्या कृत्यावर हायकोर्टचा संताप

High Court : स्वत:च्या पत्नीचे अश्लील व्हिडीओ फेसबुकवर अपलोड करणाऱ्या पतीला कोर्टाने खडेबोल सुनावले आहेत. पीडितने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात गेले. या प्रकरणाची चर्चा होत आहे.
High Court News
High Court NewsGoogle
Published On

पत्नीचा अश्लील व्हिडीओ बनवून फेसबुकवर अपलोड केल्या प्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाने संताप व्यक्त केली आहे. 'लग्नानंतर पतीचा पत्नीवर मालकी हक्क येत नाही. लग्नामुळे पत्नीची स्वायत्तता आणि गोपनीयतेचा अधिकार कमी होत नाही खासगीत घडलेल्या गोष्टींचा व्हिडीओ फेसबुकवर अपलोड करुन पतीने वैवाहिक नात्याचे पावित्र्य भंग केले आहे', असे हायकोर्टाने म्हटले.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने मिर्जापूरच्या पोलीस ठाण्यात पतीच्या विरोधात आयटी कायद्याच्या कलम ६७ अन्वये तक्रार नोंदवली होती. 'माझ्या पतीने परवानगीशिवाय आमचा एक अश्लील व्हिडीओ बनवला आणि फेसबुकवर अपलोड केला', असा आरोप या महिलेने पोलिसांसमोर केला. हे प्रकरण अलाहाबाद हायकोर्टात गेले. पीडितेच्या पतीने हायकोर्टात आरोपपत्र रद्द करण्याची विनंती केली होती.

अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश विनोद दिवाकर यांनी आरोपपत्र रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली. अशा प्रकारे अश्लील व्हिडीओ तयार करुन पोस्ट करुन आरोपीने पती आणि पत्नी यांच्यातील नातेसंबंधातील गोपनीयतेचे उल्लघंन केले आहे. हा एका प्रकारचा विश्वासघात आहे. या प्रकारामुळे त्यांचे नातेसंबंध बिघडू शकतात, असे हायकोर्टाचे न्यायाधीश विनोद दिवाकर यांनी म्हटले.

High Court News
IPL 2025 : हैदराबाद मुंबईविरुद्ध ३०० धावा मारणार; आरसीबीच्या माजी खेळाडूची मोठी भविष्यवाणी, पण 'पलटन' गेम पालटणार?

पत्नी ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे. तिच्यावर पतीचा मालकी हक्क नाही. तिचे स्वतःचे हक्क, अधिकार आहेत. तिच्या इच्छा, आकांक्षा देखील आहेत. तिच्या स्वातंत्र्याचा सन्मान करणे हे पतीचे कर्तव्य आहे. नात्यातील समतोल आणि सन्मानपूर्वक संबंध वाढवण्यासाठी स्वातंत्र आणि गोपनीयतेचे पालन करणे हे पतीचे नैतिक कर्तव्य आहे, असे म्हणत न्यायालयाने पीडितेच्या पतीला फटकारले आहे.

High Court News
Meerut Murder Case : हत्येपूर्वी बाईकवर दिसला होता सौरभ, मुस्कानसाठी घेतलं पार्सल; शेवटच्या क्षणी काय घडलं? CCTV फुटेज समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com