Political News : शिंदेंसेनेच्या नेत्याला अटक, घराबाहेर सापडली ड्रग्सने भरलेली बॅग; राजकारणात खळबळ

Shivsena leader siddhesh parab arrested: सिंधुदुर्गातील शिरोडा देऊळवाडी येथे पोलिसांची मोठी कारवाई. गांजा आणि कोकेनसदृश पदार्थ जप्त केल्याची माहिती; शिंदे सेनेचे उपजिल्हाप्रमुख सिद्धेश परब यांना ताब्यात घेतले.
Sindhudurga Deputy District Chief Siddhesh Parab Arrasted
Sindhudurga Deputy District Chief Siddhesh Parab ArrastedSaam Tv
Published On
Summary
  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग पोलिसांची अमली पदार्थांविरोधात धडक कारवाई

  • ७१० ग्रॅम अमली पदार्थ जप्त

  • जप्त केलेल्या पदार्थांमध्ये गांजा आणि कोकेनसदृश पदार्थ

  • या प्रकरणात शिंदेसेनेचे उपजिल्हाप्रमुख सिद्धेश परब यांना पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले

विनायक वंजारे, सिंधुदुर्ग

Vengurala Eknath Shinde Sivsena Deputy District Chief Siddhesh Parab Drugs Case News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा देऊळवाडी येथे करण्यात आलेल्या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी एका घराच्या बाहेरील पडवीतून अमली पदार्थाने भरलेली बॅग जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी संशयित म्हणून शिंदे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सिद्धेश परब यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या बॅगेत गांजा आणि कोकेनसदृश अमली पदार्थ आढळून आल्याचे सांगण्यात येत असून, एकूण सुमारे ७१० ग्रॅम अमली पदार्थ मिळून आल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वेंगुर्ला पोलीस करत आहेत. एका सत्ताधारी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या घराच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त झाल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे. या कारवाईनंतर प्रकरणाला राजकीय रंग मिळण्याची शक्यता व्यक्त होत असली, तरी पोलिसांच्या तपासातून या प्रकरणातील नेमके सत्य आणि अमली पदार्थांचा स्रोत स्पष्ट होणार आहे.

Sindhudurga Deputy District Chief Siddhesh Parab Arrasted
Ayurveda Benefits : सर्दी-खोकला झटक्यात नाहीसा, डिप्रेशनवरही मात;जाणून घ्या 'या' आयुर्वेदिक वनस्पतींचे फायदे

गणेश चतुर्थीच्या तोंडावर सिंधुदुर्ग पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध धंदे करणाऱ्यांची झोप उडाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर पोलिसांकडून विविध ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. विशेषतः अमली पदार्थांची विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून, संशयित ठिकाणी तपासणी आणि छापेमारीची मोहीम सुरू आहे. शिरोडा येथील कारवाईमुळे या मोहिमेला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

Sindhudurga Deputy District Chief Siddhesh Parab Arrasted
Gavar Side Effects : गवार खाणं 'या' लोकांसाठी ठरू शकत धोकादायक! 'ही' ६ कारणे वेळीच घ्या जाणून

दरम्यान, सिद्धेश परब यांच्यावरील आरोप अद्याप तपासाच्या प्रक्रियेत असून, न्यायालयीन प्रक्रियेनंतरच या प्रकरणातील पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. पोलिसांच्या तपासात अमली पदार्थांचा नेमका साठा कुठून आला, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि त्याचे वितरण कुठे केले जाणार होते, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com