

विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या
विधानपरिषदेच्या ९ जागा, एका ठिकाणी पोटनिवडणूक होणार
शिवसेनेच्या उमेदवारीवर संजय शिरसाट यांचं मोठं भाष्य
महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय. विधानपरिषदेच्या १० जागांवर निवडणूक होणार आहे. या जागांसाठी राज्यातील विविध नेत्यांकडून फिल्डिंग लावली जात आहे. बच्चू कडू यांनीही विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. परंतु शिवसेनेकडून विधानपरिषदेची उमेदवारी हवी असेल, तर प्रहार संघटना शिवसेनेत विलीन करा, अशी मागणी शिवसेनेची असल्याची माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बच्चू कडू यांच्यावर मंत्री संजय शिरसाट यांनी भाष्य केलं. 'येणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत अनेक इच्छुक आहेत. ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही , तेही आहेत. बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे अधिकृत सांगत नाही, तोपर्यंत कोणतेही नाव निश्चित नाही.१२ नावे आहेत, त्याबाबत योग्य निर्णय होईल.
'बच्चू कडू यांनी प्रहार संघटना शिवसेनेत विलीन करावी अशी मागणी आहे. मात्र अजून उमेदवारी दिली नाही, उमेदवारी दिल्यानंतर काय करायचं ठरवावं लागेल. नीलम गोऱ्हे यांचं नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे. मात्र वेळोवेळी अनेकांचे नाव निश्चित होण्याच्या बातम्या समोर येतील, मात्र पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितल्या शिवाय निर्णय नाही', असे त्यांनी सांगितले.
परप्रांतीय रिक्षा चालकांना मराठी सक्तीवबाबत शिरसाट म्हणाले, ' जे लोक काल बिहार, उत्तर प्रदेशातून आले. त्यांना मराठी बोलणे जड जाईल. मात्र वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राहतो, त्याला मराठी बोलता आले पाहिजे. त्यामुळे मागणी योग्य आहे. काही गोष्टींमध्ये कालावधी मिळाला पाहिजे'.
'दबाव वाढत नाही.प्रताप सरनाईक यांनी भूमिका घेतली, त्यांच्यावर सरकार बोलायला तयार आहे.प्रताप सरनाईक यांनी उत्तर दिले आहे, असे त्यांनी सांगितले. अशोक खरात प्रकरणावरही शिरसाट यांनी भाष्य केलं. 'इम्तियाज जलील, नाशिक येथील धर्मांतर प्रकरण आणि अशोक खरात प्रकरण वेगळं आहे. कोणतं प्रकरण दाबायचं हा खेळ सरकार करत नाही. अशोक खरात याच्यावर गुन्हे दाखल होत आहेत'असे त्यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजनेवर ते म्हणाले, 'KYC करावी यातही अधिकाऱ्यांनी परिपत्रक काढलं आहे. काही महिला शिकलेल्या नसतात, त्यांच्यासाठी दर वेळी मुदत दिली आहे. आताही मुदतवाढ दिली आहे. गैरफायदा घेऊ नये, यासाठी KYC करून घ्यावी'.
संजय गायकवाड यांच्या विरोधातील आंदोलनावर संजय शिरसाट म्हणाले, 'संजय गायकवाड यांनी भावनेच्या भरात वक्तव्य केलं आहे. पुस्तक वाचलं नसल्याचं त्यांनी सांगितले. त्यांनी मांडतांना चुकीचे मत मांडले, याबाबत एकनाथ शिंदे यांनी गायकवाड यांना समाज दिली आहे'. बागेश्वर बाबाबाबत शिरसाट म्हणाले, 'तो माफी मागणार मला माहित आहे. या लोकांनी तोंडाला चिमटा बसवला पाहिजे. महाराजांनी संस्कृती परिस्थितीबद्दल बोललं पाहिजे. मात्र असं बोलू नये.केंद्र सरकारने अनेक महाराजांना जेलमध्ये टाकले आहे.सरकार कारवाई करत नाही. असा भाग नाही'.