बापानंतर मुलाचा कारनामा; कारच्या बोनेटवर उभं राहून विरोधकांना अश्लील शिवीगाळ

sanjay gaikwad son video viral : बापानंतर मुलाचा कारनामा उघडकीस आला आहे. कारच्या बोनेटवर उभं राहून विरोधकांना अश्लील शिवीगाळ केल्याचे समोर आलं आहे.
kunal gaikwad viral video
kunal gaikwad Saam tv
Published On
Summary

संजय गायकवाड यांच्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल

निवडणुकीदरम्यान मुलाकडून विरोधकांना शिवीगाळ

शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हारल झाल्यानंतर लोकांकडून संताप

दिवंगत लेखक गोविंद पानसरे यांचे 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकावरून आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून शिवागाळ केली होती. शिवीगाळ केल्यानंतर त्यांच्यावर चहूबाजूने टीका झाली. टीकेनंतर काल आमदार संजय गायकवाड यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर आता आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाने अश्लील शिवीगाळ केल्याचे समोर आलं आहे. मुलाचा अश्लील शिवीगाळ केल्याचे समोर येताच नागरिकांकडून एकच संताप व्यक्त केला जात आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना केलेल्या अश्लील शिवीगाळीच्या ऑडिओ क्लिपनंतर त्यांच्या मुलाची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यावरून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. कुणाल गायकवाड असे त्यांच्या मुलाचे नाव आहे. कुणाल गायकवाड हे कारच्या बोनेटवर उभं राहून विरोधकांना अश्लील शिवीगाळ करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

kunal gaikwad viral video
शिंदेंच्या आमदाराची गुंडगिरी कधी थांबणार? छत्रपती शिवरायांचा आदर करताना जीभ घसरली, ऑडिओ क्लिप व्हायरल

कुणाल यांचा व्हिडिओ नगरपरिषद निवडणुकीदरम्यान व्हायरल झाला होता. मात्र पुन्हा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. कुणाल गायकवाड हे बुलढाणा नगरपरिषदेचे सदस्य असून नगर परिषदेतील गटनेता सुद्धा आहे.

त्यांनी नगरपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी प्रतिस्पर्धी असलेल्या नेत्याच्या घरासमोर कारच्या बोनेटवर उभे राहून अश्लील शिवीगाळ करत आव्हान दिले होते. त्यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओची साम टीव्ही पुष्टी करत नाही. परंतु हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

kunal gaikwad viral video
भाजपचा 'हा' नेता म्हणजे दुसरा अशोक खरात, त्यानं पोरींची इज्जत लुटली; शिंदेसेनेच्या आमदाराचा गंभीर आरोप

दीपक केदार यांचा अनोखा इशारा

बुलढाणा येथे राजकीय वातावरण तापले असून ऑल इंडिया पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक केदार यांनी आमदार गायकवाड यांना अनोख्या शैलीत इशारा दिलाय. 'आमचं आणि शिव्यांचं नातं खूप जुनं आहे. गरज पडली तर बुलढाण्यात शिवीगाळ परिषद आयोजित करू,” असे वक्तव्य करून केदार यांनी गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'त्या परिषदेत शिव्यांचा अर्थ समजून घेताच विरोधकांचा खेळ गुंडाळला जाईल,” असा टोलाही त्यांनी लगावलाय. त्यांच्या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com