अजित पवारांच्या अपघातानंतर आता एकनाथ शिंदेंच्या आमदारांचा मोठा निर्णय, राजकीय गोटात हालचालींना वेग

Eknath Shinde Avoids Vsr Flight: अजितदादांच्या अपघातानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विमान प्रवासाचा धसका घेतलाय... शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंना नेमकी काय विनंती केलीय...आणि VSR कंपनीसंदर्भात शिंदेसेनेनं कोणता अघोषित निर्णय घेतलाय...
Deputy Chief Minister Eknath Shinde reportedly reviews air travel safety after Ajit Pawar plane accident controversy.
Deputy Chief Minister Eknath Shinde reportedly reviews air travel safety after Ajit Pawar plane accident controversy.Saam Tv
Published On

अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्याच्या राजकारणात विमान कंपन्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय...ज्या व्हिएसआर कंपनीच्या विमानातून दादांनी प्रवास केला... त्याच व्हीएसआर कंपनीच्या चार विमानांवर बंदी घालण्यात आली..या बंदीनंतर शिंदेसेनेतील आमदारांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विनंती केलीय... दादांच्या मृत्यूनंतर शिंदेंनी विमान प्रवासाचा धसका घेत काय निर्णय घेतलाय...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून विमान प्रवासाचा सर्वाधिक वापर

सुरक्षेसाठी मंत्र्यांकडून शिंदेंना VSR कंपनीच्या विमानातून प्रवास न करण्याची विनंती

शिंदेसेनेचे नेते, मंत्री VSR कंपनीचं विमान वापरणार नाही

शिंदेंनीही आमदाराची विनंती एकून निर्णयाला मान्यता दिल्याची चर्चा

दरम्यान अजितदादांच्या विमान अपघाताचा तपास जोपर्यंत पूर्ण होत नाही.. तोपर्यंत सुरक्षेच्या कारणामुळे व्हीएसआर कंपनीची सेवा नाकारण्यावर शिंदेसेना ठाम आहे..या निर्णयामुळे दादांच्या विमान अपघाताबाबतचा संशय बळावत असल्याची प्रतिक्रिया शरद पवारांच्या राष्ट्रवादीने व्यक्त केलीय..

शिंदेसेनेच्या या निर्णयामुळे डीजीसीए आणि इतर तपास यंत्रणांवर तपासासाठी दबाव वाढणार आहे... अशा अपघाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शिंदेसेनेनं उचललेलं हे पाऊल अत्यंत महत्त्वाचं मानलं जातयं...आता सुरक्षेसाठी घेतलेला हा निर्णय राज्यातील इतर पक्षही अंमलात आणणार का? VSR वरील अघोषित बंदी अधिकृतरित्याही ाहीर केली जाणार का? याकडे सर्वाचं लक्ष लागलयं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com