E-Sakal No1 Marathi News: महाराष्ट्रात डिजिटल न्यूजमध्ये ई-सकाळचा पुन्हा दबदबा; सलग दुसऱ्यांदा पटकावलं अव्वल स्थान

महाराष्ट्रातील डिजिटल माध्यमांच्या स्पर्धेत ई-सकाळने पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. कॉमस्कोरच्या ताज्या आकडेवारीनुसार ई-सकाळ सलग दुसऱ्या महिन्यात महाराष्ट्रातील नंबर १ डिजिटल न्यूज पोर्टल ठरले आहे.
E-Sakal No.1 Marathi News Website in Comscore Ranking
ई-सकाळsaam tv
Published On

मराठी डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सध्या मोठी स्पर्धा निर्माण झालीये. विविध न्यूज प्लॅटफॉर्ममध्ये वाचकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी स्पर्धा तीव्र होत असताना ई-सकाळने पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केलीये. कॉमस्कोरच्या रेटिंगमध्ये मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये ई-सकाळने सलग दुसऱ्यांदा पहिलं स्थान मिळवत आघाडी कायम राखलीये. मराठी वाचक ई-सकाळला मोठ्या प्रमाणात पसंती देत असल्याचं या निकालातून स्पष्ट होतं.

डिजिटल न्यूज क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि दर्जेदार कामगिरीमुळे ई-सकाळने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीये. अचूकता, वेग आणि विश्वासार्हता या तिन्ही गोष्टींचा समतोल साधत बातम्या देण्यावर या प्लॅटफॉर्मचा भर राहिला आहे. याच सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे कॉमस्कोरच्या रेटिंगमध्ये अग्रस्थान गाठणं शक्य झालं आहे.

E-Sakal No.1 Marathi News Website in Comscore Ranking
High Blood Pressure: रोजच्या धावपळीत ताण-थकवा येतोय; दुर्लक्ष करणं पडेल महागात, BPसोबत वाढतील 'या' समस्या

ई-सकाळच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर बदलते ट्रेंड, ब्रेकिंग न्यूज, राजकीय घडामोडी, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बातम्या, लाइफस्टाईल, तंत्रज्ञान तसंच मनोरंजन क्षेत्रातील अपडेट्स अशा अनेक विभागांमधील बातम्या उपलब्ध असतात. 2025 च्या कॉमस्कोर अहवालानुसार, मराठी भाषेतील न्यूज आणि माहिती देणाऱ्या डिजिटल माध्यमांमध्ये ई-सकाळने अव्वल क्रमांक पटकावलाय.

E-Sakal No.1 Marathi News Website in Comscore Ranking
High Blood Pressure: रोजच्या धावपळीत ताण-थकवा येतोय; दुर्लक्ष करणं पडेल महागात, BPसोबत वाढतील 'या' समस्या

सलग मिळालेल्या या यशामुळे मराठी डिजिटल पत्रकारितेत ई-सकाळने एक नवीन बेंचमार्क सेट केला आहे. सकाळ मीडिया समूहाच्या स्पष्ट डिजिटल धोरणांमुळे आणि योग् दृष्टिकोनामुळे ई-सकाळने ऑनलाइन माध्यमांमध्ये आपलं नेतृत्व टिकवून ठेवलंय.

E-Sakal No.1 Marathi News Website in Comscore Ranking
High Blood Pressure: औषधांशिवाय घरीच ठीक होईल हाय ब्लड प्रेशरची समस्या; डॉक्टरकडे जाण्याआधी ट्राय करा घरगुती उपाय

पुढील काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नवे प्रयोग आणि वाचककेंद्री माहिती देण्याच्या धोरणाच्या बळावर ई-सकाळ डिजिटल पत्रकारितेत आणखी उंची गाठेल असा विश्वास व्यक्त केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com