Nagpur News: नागपूर-भंडारा महामार्गावरील मानवधर्म आश्रमाशेजारील पुलास मानवधर्म आश्रम नाव देणार: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis In Nagapur: पावडदौना येथील परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रमाच्या परिसर विकास आराखड्यास मंजुरी देवून निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा, देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Devendra Fadnavis In Nagpur
Devendra Fadnavis In Nagpur Saam Tv
Published On

Devendra Fadnavis In Nagpur:

पावडदौना येथील परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रमाच्या परिसर विकास आराखड्यास मंजुरी देवून निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मौदा तालुक्यातील पावडदौना येथे स्थित परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रमात प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने होम हवन, झेंडा वंदन, सेवक मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थिती लावली व संबोधित केले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Devendra Fadnavis In Nagpur
Weather Update: देशातील या राज्यांमध्ये कडाक्याच्या थंडीसह पसरणार दाट धुक्याची चादर, हवामान विभागाने दिला इशारा

परमात्मा एक सेवक मानवधर्म मंडळाचे अध्यक्ष राजू मदनकर, खासदार कृपाल तुमाने, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, टेकचंद सावरकर, ॲड. आशिष जयस्वाल, नरेंद्र भोंडेकर, सुनील केदार, ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आदी यावेळी उपस्थित होते. (Latest Marathi News)

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, परमात्मा एक सेवक मानवधर्म मंडळाचे संस्थापक बाबा जुमदेव यांनी माणसातील देव शोधण्याचा संदेश देत चार शब्द, तीन तत्व, पाच नियमावर हा मानवधर्म स्थापन केला. बाबा जुमदेव हे स्त्री आणि पुरुष या दोनच जाती मानत मानवधर्म स्थापन करून सर्व समाजातील लोकांना एकत्र केले. त्यांनी व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलनाचे मोठे कार्य केले. महाराष्ट्रासह , छत्तीसगड,मध्यप्रदेशात या मानवधर्माचे असंख्य अनुयायी आहेत.

Devendra Fadnavis In Nagpur
Shinde Government: मराठा आरक्षणामुळं शेतकऱ्यांना शेतमाल थेट‌ मुंबईत‌ विकण्याची‌ मुभा, सरकारनं काढलं परिपत्रक

'नागपूर-भंडारा महामार्गावरील मानवधर्म आश्रमाशेजारील पुलास मानवधर्म आश्रम नाव देण्यात येईल'

या मानवधर्म मंडळाचे कार्य कौतुकास्पद असून पावडदौना स्थित परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रमासाठी तयार करण्यात आलेल्या परिसर विकास आराखड्यास मंजुरी देवून निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे फडणवीस म्हणाले. तसेच, नागपूर-भंडारा महामार्गावरील मानवधर्म आश्रमाशेजारील पुलास मानवधर्म आश्रम नाव देण्यात येईल त्यासाठी आवश्यक कार्यवाही करू असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com