Weather Update: देशातील या राज्यांमध्ये कडाक्याच्या थंडीसह पसरणार दाट धुक्याची चादर, हवामान विभागाने दिला इशारा

Weather News: उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. यातच शुक्रवारी हवामान खात्याने सांगितले की, पुढील पाच दिवस उत्तर प्रदेश आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये दाट धुके पडणार आहे.
Weather News
Weather NewsSaam Tv
Published On

Weather Update:

उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. यातच शुक्रवारी हवामान खात्याने सांगितले की, पुढील पाच दिवस उत्तर प्रदेश आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये दाट धुके पडणार आहे. याशिवाय पुढील दोन दिवसांत उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली येथे किमान तापमान तीन ते सहा अंशांच्या दरम्यान आहे. तर उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशात किमान तापमान 7-10 अंशांच्या दरम्यान नोंदवण्यात आलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Weather News
Shinde Government: मराठा आरक्षणामुळं शेतकऱ्यांना शेतमाल थेट‌ मुंबईत‌ विकण्याची‌ मुभा, सरकारनं काढलं परिपत्रक

हरियाणाच्या हिसारमध्ये आज सर्वात कमी तापमान 2.7 अंश नोंदवले गेले आहे. हवामान खात्याचे म्हणणे आहे की, येत्या दोन दिवसांत पश्चिम हिमालयीन भागात पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी तीन ते चार दिवस पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अंदमान आणि निकोबारमध्ये 26 ते 29 जानेवारीला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Latest Marathi News)

हवामान खात्यानुसार, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, बिहारमध्ये 26 जानेवारी ते 31 जानेवारीच्या रात्री दाट धुके पडणार आहे. 27 ते 29 जानेवारी रोजी राजस्थान, उत्तराखंड, पश्चिम मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरामध्ये 27 आणि 28 जानेवारीला दाट धुके पडण्याची शक्यता आहे.

Weather News
Maratha Reservation: आज रात्रीच मराठा समाजाला मिळणार गोड बातमी? सरकारने घेतला मोठा निर्णय

याशिवाय उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये 26 ते 30 जानेवारी आणि पश्चिम राजस्थानमध्ये 26 ते 28 जानेवारीपर्यंत गारठा आणखी वाढणार, असं हवामान विभागाने सांगितलं आहे. तसेच पंजाब, हरियाणा, चंदीगड, पूर्व राजस्थानमध्ये 26 आणि 27 जानेवारीपर्यंत आणि उत्तराखंडमध्ये 26 जानेवारी रोजी थंडीत वाढ होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com