CM फडणवीसांच्या कार्यक्रमस्थळी अचानक ड्रोनच्या घिरट्या; पोलिसांची तारांबळ, राजकीय वर्तुळात खळबळ

Drone Spotted At CM Devendra Fadnavis Event In Yeola: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या येवला दौऱ्यात कार्यक्रमस्थळी ड्रोन आढळल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र ड्रोन परवानगीने उडविण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने सुरक्षेचा धोका नसल्याचे सांगितले.
Police and security personnel on alert after a drone was spotted near CM Devendra Fadnavis’ event venue in Yeola, Nashik.
Police and security personnel on alert after a drone was spotted near CM Devendra Fadnavis’ event venue in Yeola, Nashik.Saam Tv
Published On

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या प्रसंगी येवला शहरात CM फडणवीसांच्या कार्यक्रमस्थळी अचानक ड्रोनच्या घिरट्या दिसल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. कार्यक्रमस्थळाच्या परिसरात ड्रोन उडताना दिसताच पोलिस यंत्रणा सतर्क झाली आणि तत्काळ ड्रोनचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे काही काळ पोलिस यंत्रणेची तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मात्र प्राथमिक चौकशीनंतर हा ड्रोन परवानगी घेऊनच उडविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. आयोजकांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, येवल्यातील कापसे फाऊंडेशनकडून ड्रोन उडविण्यासाठी आवश्यक ती अधिकृत परवानगी घेण्यात आली होती. याबाबतची माहिती पोलिस यंत्रणेनेही दिली असून, कोणताही सुरक्षेचा धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Police and security personnel on alert after a drone was spotted near CM Devendra Fadnavis’ event venue in Yeola, Nashik.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न का मिळाला नाही? RSS प्रमुख मोहन भागवत यांंचं मोठं विधान

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येवल्यातील अनुलोम संवाद कार्यक्रमात उपस्थित असून कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत आहेत. येवल्यातील कापसे फाऊंडेशनच्या आवारात हा कार्यक्रम सुरू असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित आहेत. ड्रोन प्रकरणामुळे निर्माण झालेला संभ्रम दूर झाल्यानंतर कार्यक्रम सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Police and security personnel on alert after a drone was spotted near CM Devendra Fadnavis’ event venue in Yeola, Nashik.
संतापजनक! मुख्याध्यापकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, संपूर्ण जिल्ह्यात खळबळ

देशाच्या विकासात जैन समाजाचे योगदान- फडणवीस

दरम्यान फडणवीस चांदवड येथील णमोकार कार्यक्रमात म्हणाले, देशाच्या विकासात जैन समाजाचे मोठे योगदान आहे. देशाची सर्वात मोठी जीडीपी जैन समाज तयार करते. देशाची जीडीपी नुसती तयार करत नाही तर दानधर्म सुद्धा करते. जे मिळाले ते माझे नाही तर सर्वांचेच असे जैन समाज समजते असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com