संतापजनक! मुख्याध्यापकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, संपूर्ण जिल्ह्यात खळबळ

yavatmal shocking : यवतमाळमध्ये मुख्याध्यापकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आलीये. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडालीये.
yavatmal news
yavatmal shockingSaam tv
Published On
Summary

जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

शिक्षकी पेशाला काळीमा, समाजमन सुन्न करणारी घटना

मुख्याध्यापकाला घाटंजी पोलिसांनीकडून अटक

संजय राठोड, साम टीव्ही

यवतमाळ : मुंबईत शाळकरी मुलीवर अत्यचाराची घटना ताजीच असताना यवतमाळमध्येही गुरू-शिष्य नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. जिल्हा परिषद शाळेतील एका मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण शाळेत खळबळ माजली आहे.

शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. पीडित विद्यार्थिनीला आमिष दाखवून मुख्याध्यापकाने गैरकृत्य केल्याचं प्रकरण समोर आलंय. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अत्याचाराच्या घटनेने पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत आरोपी मुख्याध्यापकाला नागपूर येथे टीईटी परीक्षेसाठी गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ एक पथक त्याच्या मागावर ठेवले.

yavatmal news
रामदास कदम हप्तेखोर, डान्सबारमधून पैसे कमावतात; ठाकरेंच्या नेत्याचा जोरदार हल्लाबोल, VIDEO

टीईटी परीक्षा आटोपून आरोपी मुख्याध्यापक यवतमाळमध्ये घरी परतला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाला ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर संबंधित मुख्याध्यापकावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

yavatmal news
पवार कुटुंबालाही संशय, घात की अपघात? विमान अपघाताचा खुलासा होणार? VIDEO

शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या घटनेने शिक्षकांसारख्या सन्माननीय पेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दोषीवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

yavatmal news
सूर्यकुमारची अर्धशतकी खेळी ठरली गेमचेंजर! भारतानं अमेरिकेला नमवलं! टीम इंडियाची विजयी सलामी

तत्पूर्वी, मुंबईतील मालाडमधील एका शाळेत शिपायाने शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ३५ वर्षीय शिपायासह शाळेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे. शाळेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने पीडित मुलीच्या पालकांना दमदाटी केल्याचाही आरोप आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com