पवार कुटुंबालाही संशय, घात की अपघात? विमान अपघाताचा खुलासा होणार? VIDEO

Ajit pawar news : अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राजकीय वर्तुळातून संशय व्यक्त केला जातोय... अशातच रोहित पवारांनी विमान अपघातावर मोठा खुलासा करणार असल्याचं संकेत दिलेत... रोहित पवार नेमकं काय म्हणाले? अजितदादांच्या अपघातावरून काय सवाल उपस्थित करण्यात येतायत? पाहूयात या रिपोर्टमधून...
ajit pawar latest news
ajit pawar news Saam tv
Published On

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला आता 10 दिवस उलटून गेलेत.. मात्र अपघाताप्रकरणी कुठलीच ठोस माहिती हाती आलेली नाहीय... अशातच राजकीय नेत्यांकडून दादांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त केला जातोय... त्यामुळे खुद्द पवार कुटुंबातील रोहित पवारांनी मौन सोडत अजितदादांच्या अपघाताबाबत सवाल उपस्थित करणार आहेत...

ajit pawar latest news
ZP Election Exit Poll : रायगड जिल्हा परिषदेत शिंदेसेना मोठा पक्ष; शेतकरी कामगार पक्षाला धक्का, एक्झिट पोलच्या अंदाजाने खळबळ

दरम्यान खराब दृश्यमानता असतानाही विमानाने लँडिंग करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... त्यामुळे अपघाताच्या तपासाला वेग आलाय.. ही चौकशी कोणत्या मुद्द्यावर केली जाणार आहे पाहूया..

दादांच्या अपघाताचा

'या' मुद्द्यांवर तपास

- खराब दृश्यमानतेत लँडिंगचा प्रयत्न का?

- कमांड सिस्टिममधील त्रुटी

- धावपट्टीवरील स्थितीबाबत सविस्तर तांत्रिक तपास

- वैमानिकाला लँडिंगसाठी देण्यात आलेल्या कमांड

ajit pawar latest news
ZP Election Exit Poll : रायगड जिल्हा परिषदेत शिंदेसेना मोठा पक्ष; शेतकरी कामगार पक्षाला धक्का, एक्झिट पोलच्या अंदाजाने खळबळ

दुसरीकडे एविएशन एक्सपर्टनं हा विमान अपघात नेमका कसा झाला? यासंदर्भात काय अंदाज व्यक्त केलाय... पाहूयात..

आता हा अपघात तांत्रिक चुकीमुळे घडला की यामागे काही वेगळे कारणं होतं? हे लवकरात लवकर समोर यायला हवं... त्यातच 10 फेब्रुवारीला रोहित पवार नेमके कोणते प्रश्न उपस्थित करणार? कोणता मोठा गौप्यस्फोट करणार? याकडे अनेकाचं लक्ष लागलयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com