भाजप आमदारानं धमकाविलं, अस्थीरोग तज्ज्ञाची तक्रार; आमदार म्हणाले...

मी त्यांना कोणतीही चुकीची भाषा वापरली नाही. मी खूप संयमाने काम करणारा व्यक्ती आहे असं आमदार कल्याणशेट्टींनी नमूद केले.
mla sachin kalyanshetti , akkalkot , bjp
mla sachin kalyanshetti , akkalkot , bjp saam tv
Published On

MLA Sachin Kalyanshetti : भारतीय जनता पक्षाचे (bjp) आमदार तसेच नवनिर्वाचित साेलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी धमकी दिल्याची तक्रार सोलापुरातील (solapur) अस्थीरोग तज्ञ आणि सोलापूर विचार मंचचे सदस्य डॉ. संदीप आडके यांनी दिली आहे. ही तक्रार डाॅ. आडके यांनी पाेलीस (police) महासंचालक यांच्याकडे पाठविल्याचे साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले. तसेच आमदार कल्याणशेट्टींबाबत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना ई-मेलद्वारे तक्रार केली आहे असेही डाॅ. आडके यांनी म्हटले आहे. दरम्यान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मात्र डॉ. आडके यांचे आरोप फेटाळून लावलेत.

अस्थिरोग तज्ञ डॉ. आडके हे सोलापूरची विमान सेवा चालू व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत. वेगवेगळ्या पातळीवरून ते यासाठी प्रयत्न करत आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून अधिवेशन सुरू होण्याआधी जिल्ह्यातील सर्व आमदारांना विमानसेवेचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करण्याची मागणी त्यांनी केली होती. याच मुद्द्यावरून आमदार कल्याणशेट्टी यांनी डॉ. आडके यांना व्हाट्सअप कॉलद्वारे अरेरावी करत धमकावल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

mla sachin kalyanshetti , akkalkot , bjp
NCP : राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर; युवा पदाधिका-यानं दिला राजीनामा, जिल्हाध्यक्षांनी फेटाळले आराेप

आमदार कल्याणशेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालकांकडे ई-मेलद्वारे केली आहे. तर पक्षाने देखील त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी थेट भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना देखील डॉ. आडके यांनी ई-मेल पाठवला असल्याचे म्हटलं आहे.

दरम्यान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळलेत. ते म्हणाले डॉ. आडके यांच्याशी माझा परिचय नाही. त्यांनी मला एक मेसेज पाठवला होता. त्या संदर्भातच त्यांच्याशी बोलणं झालं. मी त्यांना कोणतीही चुकीची भाषा वापरली नाही. मी खूप संयमाने काम करणारा व्यक्ती आहे.

mla sachin kalyanshetti , akkalkot , bjp
Crime News : आईचं वर्षश्राद्ध; पाचशे रुपयांवरुन भावानं काढला भावाचा काटा, चाैघे अटकेत

त्यामुळे आता पोलीस प्रशासन याबाबत काय भूमिका घेतेय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी नुकताच जिल्हाध्यक्षपदाचा पदभार स्विकारलाय त्यातच हे धमकी प्रकरण नक्की कोणते वळण घेणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com