दिवाळीची मिठाई खाताना सावधगिरी बाळगा! मिठाईला चांदीचा वर्ख की अल्युमिनियम फॉईल?

Fake Silver Leaf on Sweets : दिवाळीसाठी मिठाई खरेदी करताय? मिठाईवरील चांदीचा वर्ख खरा आहे की अ‍ॅल्युमिनियमचा थर, याबाबत एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.
Diwali Sweets Alert: Silver Leaf Or Aluminium Foil? FDA Commissioner Warns Consumers
Diwali Sweets Alert: Silver Leaf Or Aluminium Foil? FDA Commissioner Warns Consumers
Published On: 
Summary
  • भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पदार्थांबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन.

  • मिठाईवरील चांदीचा वर्ख खरा आहे की त्याऐवजी अ‍ॅल्युमिनियमचा वापर

  • परवाना असलेल्या दुकानातून आणि योग्य लेबल असलेली मिठाई खरेदी करण्याचा सल्ला.

दिवाळीच्या तोंडावर मिठाईला प्रचंड मागणी असताना आता भेसळीला पेव फुटलंय. तुम्ही सणाचा गोडवा वाढवण्यासाठी सोने-चांदीचा वर्ख असलेली मिठाई खात असाल तर सावधान! कारण, एका तपासणीत धक्कादायक वास्तव समोर आलंय. याच पार्श्वभूमीवर एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंनी नागरिकांना आवाहन केलंय. पाहूयात यावरचा हा रिपोर्ट.

दिवाळीचा सणात मिठाईला प्रचंड मागणी असते. साहजिकच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन मिठाईचे प्रकार मार्केटमध्ये येत असतात.. त्यातही सोने आणि चांदीचे वर्ख असलेली मिठाईदेखील ग्राहकांना भूरळ घालत असते. मात्र, चांदीमध्ये जिवाणूरोधक गुणधर्म असल्यामुळे ती मिठाईला दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत करते, असा जर तुमचा समज असेल तर सावधान. कारण, तपासणीतून धक्कादायक वास्तव समोर आलंय

Diwali Sweets Alert: Silver Leaf Or Aluminium Foil? FDA Commissioner Warns Consumers
'सावत्र वागणुकीचा त्रास होतो, पण कर्तव्य आठवलं की...' मुंढेंनी सांगितला तणावमुक्तीचा मार्ग!

अनेक मिठाईंवरील वर्खात शून्य चांदी आणि 99 टक्क्यांपर्यंत ॲल्युमिनियम असल्याचं तपासणीतून समोर आलंय. बनावट सोन्याच्या वर्खात तांबे आणि जस्त यांसारखे धातू असण्याची शक्यता आहे. काही नमुन्यांमध्ये कॅडमियम आणि इतर विषारी रसायनेदेखील आढळून आली आहेत. महत्त्वाचं म्हणजे, तुम्ही खात असलेल्या मिठाईवरील चांदीचा वर्ख खरा की खोटा हे तुम्हीही ओळखू शकता.

मिठाईवरील चांदीचा वर्ख हातात घेतल्यावर विरघळतो की त्याची फॉईल तयार होते, हे पाहा. वर्खाची फॉईल तयार होत असेल तर तो अॅल्युमिनियमचा असू शकतो. सणासुदीच्या तोंडावर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA अॅक्शन मोडवर आलंय. इतकंच नव्हे तर अशा बनावट वर्ख विकणारी मिठाईची दुकानं एफडीएच्या रडारवर आली आहेत.

Diwali Sweets Alert: Silver Leaf Or Aluminium Foil? FDA Commissioner Warns Consumers
तुकाराम मुंढेंना IAS ऐवजी IPS व्हायचं होतं? मुलाखतीतील प्रश्नावर मुंढेंचं भन्नाट उत्तर, पाहा व्हिडिओ

सणासुदीच्या काळात मिठाईला असणाऱ्या प्रचंड मागणीचा फायदा घेण्यासाठी अनेक नफेखोर दुकानदार ग्राहकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. कृत्रिम रंगांनंतर आता मिठाईंवरील सोने-चांदीचे वर्ख लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत प्रशासननं दिलेत. त्यामुळे सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मिठाई नक्की खा पण आरोग्याशी तडजोड करू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.