हृदयद्रावक! दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

Dindori Car Falls Into Well 9 Family Members Dead: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला. स्नेहसंमेलनावरून परतताना कार विहिरीत कोसळल्याने 6 विद्यार्थ्यांसह 9 जणांचा जागीच मृत्यू झाला.
Car plunges into a farm well in Dindori, Nashik, killing nine members of the same family, including six students
Car plunges into a farm well in Dindori, Nashik, killing nine members of the same family, including six studentsSaam Tv
Published On

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिक: जिल्ह्यातील दिंडोरीमध्ये मध्यरात्री झालेल्या अपघाताने अक्षरशः काळीज पिळवटले आहे. शिवाजीनगर परिसरात एका मंगल कार्यालयात खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आटोपून घरी इर्टीका कारने परतत असताना सदर कार जवळ असलेल्या शेतातील विहीरीमध्ये कोसळल्याने एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना शुक्रवारी (दि.3) रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. मृतामध्ये 6 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Car plunges into a farm well in Dindori, Nashik, killing nine members of the same family, including six students
नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत

मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी शहरातील शिवाजीनगर भागात असलेल्या राजे बँक्वेट हॉलमध्ये एका खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनामध्ये शहारासह आसपासच्या गावांतील विद्यार्थी आई त्यांचे पालक उपस्थित होते. रात्री 10 वाजेच्या सुमारास स्नेहसंमेलन आटोपल्यानंतर इंदोरे, ता. दिंडोरी येथील दरगोडे कुटुंबियातील सदस्य इर्टीका कारने घरी परतण्यासाठी निघाले असता मंगल कार्यालयाजवळच शेतात असलेल्या एका विहरीत सदर कार जाऊन कोसळली आणि यामध्ये एकाच परिवारातील 9 जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Car plunges into a farm well in Dindori, Nashik, killing nine members of the same family, including six students
लक्ष्मण हाकेंना गावाबाहेर काढा; शिवरायांच्या पुतळ्यावरून माढ्यात राडा|VIDEO

दिंडोरी अपघातातील मृतांची नावे समोर -

१) रेश्मा सुनील दरगुडे वय २७

२) आशा अनिल दरगुडे वय ३२

३) खुशी अनिल दरगुडे वय १४

४) श्रेयस अनिल दरगुड वय ११

५) राखी सुनील दरगुडे वय ११

६) श्रावणी अनिल दरगुडे ११

७) समृद्धी राजेंद्र दरगुडे वय ७

८) माधुरी अनिल दरगुडे वय १३

९) सुनील दत्तू दरगुडे वय ३२

Car plunges into a farm well in Dindori, Nashik, killing nine members of the same family, including six students
नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला! पोलिसांनी काढली अशोक खरातची वरात, पाहा VIDEO

या अपघाताने दरगुडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. दरम्यान मंत्री नरहरी झिरवळ आणि मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत कुटुंबियांच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. तसेच गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फोनवर 5 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर विहीर मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com