Dhule News: शेतकरी आंदोलनाला पाठींबा; हजारोच्या संख्येने आदिवासी बांधवांचा धडकला मोर्चा

शेतकरी आंदोलनाला पाठींबा; हजारोच्या संख्येने आदिवासी बांधवांचा धडकला मोर्चा
Dhule News
Dhule NewsSaam tv
Published On

धुळे : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या (Farmer) आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच आदिवासी वनहक्क कायदा अंमलबजावणी करण्यात यावी. एमएसपी गॅरंटी या मागण्यांसाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचा मोर्चा धुळे (Dhule) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. (Tajya Batmya)

Dhule News
Jalgaon News: भर चौकात व्यापाऱ्याला लूटले; ८ लाखांची रोकड घेवुन झाले पसार

आपल्या मागण्यांसाठी मोर्चा घेऊन आलेले आदिवासी बांधव बिराडासह आले असल्‍याने जिल्हा प्रशासनावर तसेच पोलीस प्रशासनावर ताण पडला आहे. धुळे शहरातील क्यूमाईन क्लब परिसरात या आदिवासी बांधवांना थांबवण्यात आले असून या ठिकाणी हजारोंची गर्दी जमली आहे. या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.

५० हून अधिक ट्रॅक्‍टर दाखल

आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधव धुळ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झालेत. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा या आदिवासी बांधवांनी घेतला आहे. ५० हुन अधिक ट्रॅक्टरमधून हजारो आदिवासी बांधव धुळे शहरात दाखल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com