Dhule crime : कॅफेमध्ये गैरकृत्य; पोलिसांच्या छापेमारीत तरुण- तरुणी सापडले

Dhule News : धुळे शहरातील देवपूरमधील जीटीपी स्टॉप येथील एका कॅफेमध्ये तरुण-तरुणींचे अशोभनीय कृत्य चालते. अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली होती.
Dhule crime
Dhule crimeDhule crime

धुळे : धुळे शहरातील कॅफेमध्ये गैरकृत्य चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता त्यानुसार छापा (Dhule) टाकण्यात आला. या कारवाई दरम्यान तरुण-तरुणींची तीन जोडपी आढळून आले. त्यांना समज देऊन सोडण्यात आले असून तीन जणांवर गुन्हे दाखल झाले. (Breaking Marathi News)

Dhule crime
Fraud Case : दहा लाखाच्या चिल्ड्रन बँकेच्या नोटा देत फसवणूक; रक्कम तीन पट करण्याचे दिले आमिष

धुळे शहरातील देवपूरमधील जीटीपी स्टॉप येथील एका कॅफेमध्ये तरुण-तरुणींचे अशोभनीय कृत्य चालते. अशी माहिती (POlice) पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तत्काळ (LCB) एलसीबीच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. यानंतर पथकाने कॅफेवर छापा टाकला. तेव्हा कॅफेमध्ये तरुण- तरुणींची दोन जोडपी अशोभनीय कृत्य करताना आढळली. इतकेच नव्हे तर बाहेरून कुलूप लावलेल्या एका कॅफेमध्ये जोडपे असल्याची माहिती मिळाल्याने त्या कॅफेच्या दरवाजाचे कुलूप तोडून पाहिले असता आतमध्ये एक जोडपे मिळून आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dhule crime
Bhusawal crime : आरपीएफ कर्मचाऱ्यावर हल्ला; रेल्वे स्थानकावर नवीन स्टॉलवरून झालेला वाद सोडविताना हल्ला

दोन्ही कॅफेंची (Dhule Police) पाहणी केली असता अशोभनीय कृत्य करण्यास सुलभ व्हावे, यासाठी बैठक व्यवस्था केल्याचे व एक तासाचे चारशे रुपये आकारले जात असल्याचे समजले. ताब्यात घेतलेल्या तरुण व तरुणींच्या पालकांना देवपूर पोलीस ठाण्यात बोलावून ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी कॅफे चालक भावेश अनिल कौलस्कर, भावेश पांडुरंग हळदे व मदतनीस धीरज विजय मोरे या तिघांविरुद्ध देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com